शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

कोल्हापूर : चुकीचा घरफाळा आकारणाऱ्यांवर कारवाई करा, ठाणेकर यांची आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:28 IST

घरफाळ्याची खोटी कर आकारणी करुन नागरीकांना मनस्ताप देणाऱ्या तसेच महापालिकेचे नुकसान आणि बदनामी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देचुकीचा घरफाळा आकारणाऱ्यांवर कारवाई करानगरसेवक ठाणेकर यांची आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर : घरफाळ्याची खोटी कर आकारणी करुन नागरीकांना मनस्ताप देणाऱ्या तसेच महापालिकेचे नुकसान आणि बदनामी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.यासदर्भात ठाणेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ए वॉर्ड सि.स.नं. १४५९/१/२ या क्रमांकावर दगड, विटा, मातीची व साध्या कौलारु बांधकामाची ८७८ स्केअर फुट क्षेत्राची जुनी इमारत असून या मिळकतीचे मुळ मालक तुकाराम हरी शिंदे होते.

मिळकतीस ६१० रुपये घरफाळा येत होता. घर मालकाने एका कुळासोबत १९९४ मध्ये कुळ रहात असलेल्या हिस्सा त्यांना खरेदी देण्याच्या उद्देशाने करारपत्र केले. परंतु आजअखेर करार पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ही इमारत मुळ मालकाच्या नावावरच आहे. तरीही या मिळकतीचे कोणाचीही मागणी नसताना सन २००४ मध्ये विभाजन करुन कुळाची भोगवटादार म्हणून नोंद केली व दुसरे बील तयार केले.

सदर कुळाकडे १७ हजार रुपये घरफाळा आकारणी केली. केवळ ३२१ स्केअर फुट हिश्शास इतकी कर आकारणी होणे अवाजवी आहे. आजरोजी कुळास १८ हजार २२० इतकी वार्षिक आकारणी होत असून चालू मागणीसह २ लाख ५९ हजार ९८९ इतकी थकबाकी दिसत आहे.मिळकतीला लागू झालेली अन्यायी घरफाळा आकारणी ताबडतोब रद्द करुन घ्यावी व योग्य आकारणीचे बील मिळकतधारकास तातडीने देण्यात यावे, तसेच चुकीच्या पध्दतीने घरफाळा आकारणी करुन महापालिकेची बदनामी व नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असेही ठाणेकर यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर