शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तालुका, शाळापातळीवर होणार ‘मोबाईल’वरील कलचाचणीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:22 IST

यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी मोबाईलवर घेतली जाणार आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि कोकण विभागांतील तालुकापातळीवरील प्रत्येक दोन शिक्षकांना शुक्रवारी कोल्हापुरात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आता तालुका आणि शाळापातळीवर शिक्षकांना या चाचणीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्यक्ष कलचाचणी दि. १८ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतालुका, शाळापातळीवर होणार ‘मोबाईल’वरील कलचाचणीचे प्रशिक्षणकोल्हापूर, कोकण विभागांतील शिक्षकांना मार्गदर्शनडिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रत्यक्षात चाचणी

कोल्हापूर : यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी मोबाईलवर घेतली जाणार आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि कोकण विभागांतील तालुकापातळीवरील प्रत्येक दोन शिक्षकांना शुक्रवारी कोल्हापुरात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आता तालुका आणि शाळापातळीवर शिक्षकांना या चाचणीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्यक्ष कलचाचणी दि. १८ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान घेण्यात येणार आहे.येथील दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी कलमापन चाचणीच्या राज्य समन्वयक पल्लवी देव, शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव टी. एल. मोळे, कोकण विभागीय सचिव भावना राजनूर, पुणे येथील ‘श्यामची आई’ फौंडेशनचे सुशांत खड्ड, प्रणव पेंडसे प्रमुख उपस्थित होते. राज्य समन्वयक देव म्हणाल्या, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कलचाचणी महत्त्वाची आहे. यावर्षी ती मोबाईलद्वारे घेतली जाणार आहे.

ही चाचणी शिक्षकांनी आनंददायी आणि तणावमुक्त वातावरणामध्ये पार पडावी. विभागीय सचिव मोळे यांनी कलचाचणीचा उद्देश आणि नव्या पद्धतीबाबतच्या प्रशिक्षणाच्या टप्प्यांची माहिती दिली. सुशांत खड्ड आणि प्रणव पेंडसे यांनी चाचणीसाठीच्या मोबाईल अ‍ॅपची माहिती दिली.

त्यांनी आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने चाचणी कशी घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांच्यासह कोल्हापूर, कोकण विभागांतील माहिती तंत्रज्ञान विषयाचे, अविरत उपक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले शिक्षक उपस्थित होते.

कोल्हापूर विभागात दीड लाख विद्यार्थीयावर्षी कोल्हापूर विभागातून सुमारे दीड लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यांची प्रत्यक्ष कलचाचणी दि. १८ डिसेंबरपासून सुरू होईल. त्यापूर्वी तालुकापातळीवरील शिक्षकांना हे प्रशिक्षण दि. ७ ते १५ डिसेंबरदरम्यान आणि त्यानंतर शाळापातळीवर दिले जाणार असल्याचे मोळे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर