शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘आपले सरकार’साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:49 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात त्या-त्या लोकसंख्येनुसार रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलैपर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्दे‘आपले सरकार’साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करा : जिल्हाधिकारीजबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळावर

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात त्या-त्या लोकसंख्येनुसार रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलैपर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी केले.राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई-सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र  माहिती तंत्रज्ञान महामंडळावर सोपविण्यात आलेली आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक केंद्र स्थापन करण्यात येईल; मात्र ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्रामपंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन केली जातील. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद १०००० लोकसंख्येसाठी एक केंद्र व प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल.

५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल. सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर