शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:19 IST

महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील (एमएलजी) उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियम आणि सूचनांनुसार गुण मिळणार आहेत.

ठळक मुद्देउत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणारशिक्षण मंडळाकडून चौकशी सुरू; एमएलजी हायस्कूलमधील प्रकरण

कोल्हापूर : महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील (एमएलजी) उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियम आणि सूचनांनुसार गुण मिळणार आहेत.दहावीच्या ‘माहिती-तंत्रज्ञान व संवाद’ या विषयाच्या नऊ उत्तरपत्रिका एमएलजी हायस्कूलमधून एप्रिलमध्ये गहाळ झाल्या. या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका भूपाली शिंदे यांनी उत्तरपत्रिका गहाळ झाल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदविली.

याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची माहिती शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने राज्य शिक्षण मंडळाला दिली. मुख्याध्यापिका शिंदे यांनी याबाबतचा अहवाल कोल्हापूर विभागीय मंडळाला दिला.

या प्रकरणाबाबत मंडळाकडून चौकशी केली जात आहे. आठ-दहा दिवसांमध्ये चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य मंडळाला सादर केला जाईल. या गहाळ उत्तरपत्रिका सापडल्या नाहीत, तर शिक्षण मंडळाच्या नियमानुसार सरासरी गुण देण्यात येतील. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी सांगितले.

कारवाई करा; अन्यथा आंदोलनउत्तरपत्रिका गहाळप्रकरणी एमएलजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवक विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. १६) शिक्षण मंडळाचे सहसचिव टी. एल. मोळे यांना दिले. या निवेदनाद्वारे सुशांत बोरगे, फिरोज सरगूर, मधुकर हरेल, बाबूराव कदम, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा