शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: पाचगाव परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर; दोन लहान मुलांना चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 08:38 IST

पाचगाव परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून लोकांना फिरताना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे.

पाचगाव - पाचगाव परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून लोकांना फिरताना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे.गेल्या आठ दिवसात दोन लहान मुलांचा पाठलाग करून कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांना सी पी आर मध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले.संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

पाचगाव सह शहराला  लागून असणाऱ्या उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षापासून लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सकाळी व सायंकाळी  फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला  जात असतात त्यांना रस्त्यावरून जात असताना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. काहीवेळा ही कुत्री वाहनधारक व सायकल स्वरांचा  पाठलाग  करून अनेकांना चावलेल्या घटनाही घडलेल्या आहेत.

 या परिसरात ठिकाणी अनेक चौकांमध्ये खाद्यपदार्थांच्या हातगाड्या चिकन मटणाची दुकाने असल्याने येथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते .खाद्यपदार्थांच्या हातगाड्या वरील खरकटे व चिकन मटणाच्या दुकानातील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट न लावता याच परिसरात टाकण्यात येते त्यामुळे भटकी कुत्री या ठिकाणी जास्त प्रमाणात येत असतात. 

प्रशासनाचे दुर्लक्ष 

परिसरातील स्वच्छता कचरा वेळेत उठाव न करणे त्यामुळे अन्नपदार्थ शोधण्यासाठी कुत्रे येतात तसेच भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण होत नसल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढू लागली आहे संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 

प्रियांका संग्राम पाटील, सरपंच, पाचगाव

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही गरज असून महापालिकेकडे पाठपुरावा करून लवकरच भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

विकी काटकर,शिवसेना करवीर , उपतालुकाप्रमुख 

पाचगाव परिसरामध्ये कुत्र्यांनी नागरिकांना अक्षरशः सळो कि पळो करून सोडले आहे.दोन दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्याने लहान मुलीचा चावा घेतल्याने तिला सी पी आर मध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले.पाचगाव ग्रामपंचायत ला वारंवार नागरिकांनी तक्रार देऊन सुद्धा पाचगाव ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा.