शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

भाकपाचे २१ पासून कोल्हापूरात राज्य अधिवेशन

By admin | Updated: February 13, 2015 23:48 IST

नामदेव गावडे : सुधाकर रेड्डी, भालचंद्र कानगो यांचे होणार मार्गदर्शन

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २२ वे राज्य अधिवेशन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होत आहे, अशी माहिती पक्षाचे नेते नामदेव गावडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.गावडे म्हणाले, २१ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता टाऊन हॉल उद्यान येथून मिरवणूक निघणार असून ती महापालिका, व्हिनस कॉर्नरमार्गे येऊन दसरा चौक येथे विसर्जित होणार आहे. अधिवेशनाच्या खुल्या सत्राचे उद्घाटन दुपारी ३ वाजता जाहीर सभेने होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी व माजी खासदार सुधाकर रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून न्यूएजचे संपादक व पक्षाचे सचिव मंडळ सदस्य शमिम फैजी, राज्य सेक्रेटरी भालचंद्र कानगो उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे भूषविणार आहेत.या अधिवेशनात विविध जिल्ह्णातून निवडून आलेले सुमारे चारशे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. ते आपली मते मांडतील. तसेच काही महत्वाच्या प्रश्नांवर विविध जिल्ह्णात सहकार, कोरडवाहू शेतीमधील समस्या, पतधोरण व शासन, केळकर समिती अहवाल अशा महत्वाच्या विषयावर विचारवंत, राजकीय कार्यकर्ते यांची मते समजून घेण्यासाठी परिसंवादही आयोजित केले आहेत. राष्ट्रीय कौन्सिलतर्फे सध्याचे राजकीय परिस्थितीबाबतचे विश्लेषण नेटवर उपलब्ध असून त्याबाबतची जाहीर चर्चा व मते आग्रहपूर्वक विचारात घेऊन भाकप राजकीय अहवाल जनतेचा बनविण्याचा प्रयत्न करत आहे.देशात सत्ता बदलली असून भाजपाने दोन्ही निवडणूकीत यश मिळविले आहे. परंतु निवडणुकीत दिलेली आश्वासने फोल ठरली होती. जनतेमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दिल्ली मधल्या निवडणुकीने भाजपाचा फोलपणा जनतेच्या लक्षात आला आहे. खासगीकरण, जागतिकीकरण, याला कॉँग्रेस किंवा धर्मांध भाजपा पर्याय असू शकत नाही. त्या पुढील काळात कोणत्या मार्गाने वाटचाल करावी, याबाबत या देशातील परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय करावा लागणार आहे. यावेळी कामगार, विद्यार्थी, युवक, शेतकरी, शेतमजूर, मोलकरीण, बॅँक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, बांधकाम मजूर, अंगणवाडी कर्मचारी आदींनी उपस्थित रहावे.यावेळी दिलीप पवार, एस. बी. पाटील, रघुनाथ कांबळे, शिवाजी माळी, अनिल चव्हाण, सुभाष वाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)