शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लंडन शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी कोल्हापूरच्या लघुपटाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:33 IST

बाललैंगिक अत्याचारावर प्रकाश टाकणाऱ्या आणि अतिशय स्फोटक विषयावर भाष्य करणाऱ्या तमस या लघुपटाची निवड प्रतिष्ठेच्या लंडन येथील शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. कोल्हापूरच्या तन्मय निनाद याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूरचे तिघेजण या लघुपटाचा भाग आहेत. दरवर्षी लंडनमध्ये होणारा हा महोत्सव यंदा २१ ते २६ जून या कालावधीत ऑनलाईन होणार आहे. फर्स्ट टाईम फिल्ममेकर सेशन्स या प्रकारात तन्मयच्या या लघुपटाची निवड झाली.

ठळक मुद्देलंडन शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी कोल्हापूरच्या लघुपटाची निवडतन्मय निनादचे दिग्दर्शन : २१ ते २६ जूनदरम्यान ऑनलाईन प्रदर्शन

संदीप आडनाईककोल्हापूर : बाललैंगिक अत्याचारावर प्रकाश टाकणाऱ्या आणि अतिशय स्फोटक विषयावर भाष्य करणाऱ्या तमस या लघुपटाची निवड प्रतिष्ठेच्या लंडन येथील शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. कोल्हापूरच्या तन्मय निनाद याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूरचे तिघेजण या लघुपटाचा भाग आहेत. दरवर्षी लंडनमध्ये होणारा हा महोत्सव यंदा २१ ते २६ जून या कालावधीत ऑनलाईन होणार आहे. फर्स्ट टाईम फिल्ममेकर सेशन्स या प्रकारात तन्मयच्या या लघुपटाची निवड झाली.तन्मय निनाद हा २१ वर्षीय तरुण कोल्हापुरातील डबिंग आर्टिस्ट निनाद काळे यांचा धाकटा चिरंजीव. वडील आणि वडीलबंधूच्या पाठोपाठ तन्मयनेही मनोरंजनाचेच क्षेत्र निवडले आहे. मात्र, डबिंग आर्टिस्टऐवजी लघुपट आणि छायाचित्रण कलेकडे त्याचा ओढा होता. पुण्यात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच नाटक, सिनेमा, लघुपट, छायाचित्रणाच्या कामाचे काम करून प्रशिक्षण घेतले. गेली चार वर्षे तो वेगवेगळ्या लघुपटांशी संबंधित आहे. देख तमाशा आणि इन्फिनिटी लॉकडाऊन हे आणखी दोन लघुपटही त्याने अलीकडेच बनविले आहेत.लहान मुलीशी समागम केल्यानंतर आजार बरा होतो, अशा मानसिकतेतून अनेक बाललैंगिक अत्याचार होत असतात, पण ते उघड होत नाहीत. दक्षिणेकडील काही राज्यांत बालिकेवर घरच्याच व्यक्तींकडून होणाऱ्या या अत्याचारांचा अतिशय स्फोटक विषय या लघुपटातून मांडला आहे.निनाद काळे हे गेली ३० वर्षे डबिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचा मोठा मुलगा २८ वर्षीय मोहक हाही मुंबईत डबिंग आर्टिस्ट आहे. डिस्कव्हरी चॅनेलवरील ह्यमॅन व्हर्सेस वाईल्ड शोह्णच्या मराठी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोहकने आवाज दिला होता.कोल्हापूरच्या तीन कलावंतांचा समावेशलॉकडाऊनपूर्वीच तयार झालेला हा लघुपट तन्मयने स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिलाच लघुपट आहे. तन्मयसोबत सायली हळदणकर आणि या लघुपटासाठी कलादिग्दर्शन करणारी श्रेयशी रासकर हे तिघेही कोल्हापूरचे आहेत. कथा आणि दिग्दर्शन तन्मय निनाद याचे असून, पटकथा आणि संकलन अनय जोशी याचे आहे. यामध्ये प्रियंका शेट्ये, सायली हळदणकर, प्रशांत थोपटे, अनय जोशी, स्वत: तन्मय आणि रोहित सिंग यांच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :Short Filmsशॉर्ट फिल्मkolhapurकोल्हापूरLondonलंडन