शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारपेठेने घेतला मोकळा श्वास, दोन हजार वाहने रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:58 IST

कोल्हापूर येथील शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तब्बल दोन हजार वाहने शहरात येण्यापासून रोखली गेली. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्दे शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारपेठेने घेतला मोकळा श्वास, दोन हजार वाहने रोखली : ११ पॉर्इंटवर ८० पोलीस : शहरातील वाहतूक कोंडी दूर

कोल्हापूर : येथील शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तब्बल दोन हजार वाहने शहरात येण्यापासून रोखली गेली. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला.शहर वाहतूक शाखेने शहरात प्रवेश करणाऱ्या ११ पॉर्इंटवर ८० पोलीस कर्मचारी दिवसभर बंदोबस्तासाठी ठेवले आहेत. या मोहिमेचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसला असून, माल शहराबाहेर ट्रकमध्ये अडकल्याने आलेले ग्राहक सोडावे लागत आहेत.शहराअंतर्गत अवजड वाहतूक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी २४ डिसेंबरपासून सुरू झाली.

शहर वाहतूक शाखेकडून ७ जानेवारीपर्यंत वाहनधारकांचे प्रबोधन व पर्यायी मार्गाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अवजड वाहनांच्या बंदीमुळे नेहमी गजबलेल्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी अशा व्यापारी पेठांमध्ये नेहमीच्या तुलनेत कमी वाहनाची वर्दळ दिसत आहे.

शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीबाबत एका अभ्यास समितीने आठ दिवस सर्व्हे करून तयार केलेल्या अहवालामुळे शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारी पेठांमध्ये रोज येणारी अवजड वाहतूक हे कोंडीचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील धान्य तसेच अन्य व्यापाऱ्यांकडे मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह अवजड वाहनांवर दिवसा शहरात बंदी करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला.

गेली तीन दिवस सहा अधिकारी व ७५ कर्मचारी दिवसभर काम करीत आहेत. सुमारे दोन हजार वाहनधारकांना शहरात येण्यापासून रोखण्यात आले. अशा वाहनांना वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी अथवा मार्केट यार्डमध्ये थांबवून ठेवले आहे.

हरकतीनंतर कायमची अंमलबजावणीशहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर ‘अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी’चे माहिती फलक लावण्यात आले आहेत. एस.टी., के.एम.टी. व अत्यावश्­यक सेवांना यातून वगळण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत लोकांच्या हरकती शहर वाहतूक शाखेत स्वीकारल्या जाणार आहेत. एकत्र बैठक घेऊन ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.अनिल गुजर ,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर