शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’, अरुणकुमार अगरवाल ‘डी. एस्सी.’ ने सन्मानित; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 16:28 IST

आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.

ठळक मुद्देदेशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या ; पी. चिदंबरम्शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’, अरुणकुमार अगरवाल ‘डी. एस्सी.’ ने सन्मानितडी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ उत्साहात शानदार, उत्साही वातावरणात २३० स्नातकांना पदवी प्रदान

कोल्हापूर : आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, तर बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी कुलपती डॉ. भटकर यांच्या हस्ते शाहू छत्रपती यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ लेटर्स’ (डी. लिट.), तर नवी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुणकुमार अगरवाल यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ (डी. एस्सी.) पदवीने गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणातील या समारंभात २३० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.

माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् म्हणाले, लोकसंख्या तज्ज्ञाच्या मतानुसार २०४५ ते २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर होईल. त्यावेळी एकूण लोकसंख्या १६० कोटीपर्यंत असेल तेव्हा यापुढे काय? असा प्रश्न आपणासमोर असेल. माझ्या मतानुसार स्थिर लोकसंख्या या ध्येयासोबत निरोगी लोकसंख्या असे ध्येय असावे.

यासाठी बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलाची निरोगी वाढ झाली पाहिजे. ते निरोगी प्रौढ बनावे. या प्रौढ व्यक्तीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने कौशल्य, गरजेतून स्वत:ला उत्पादक बनवून लोकांच्या उपयोगाला आले पाहिजे.

कुलपती डॉ. भटकर म्हणाले, शैक्षणिक, संशोधन आणि आरोग्य सेवेतील विद्यापीठाची कामगिरी, वाटचाल ही अभिमानास्पद आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहे. आरोग्यपूर्ण समाज घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

या दीक्षान्त समारंभाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक डॉ. ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह दीक्षान्त मंडपात आले. या कार्यक्रमास याज्ञसेनीराणी साहेब, शांतादेवी डी. पाटील, खासदार संभाजीराजे, महापौर स्वाती यवलुजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. रचना पावसकर व चैतन्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठ