कोल्हापूर : चिदंबरम यांच्या उपस्थितीत ‘डी. वाय.पाटील विद्यापीठा’चा शनिवारी दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:28 PM2018-01-18T16:28:18+5:302018-01-18T16:57:00+5:30

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. लिट.’ आणि डॉ. अरूण कुमार अगरवाल यांना ‘डी.एस्सी. पदवी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

Kolhapur: In the presence of Chidambaram, D. Convocation ceremony of YP Patil University on Saturday | कोल्हापूर : चिदंबरम यांच्या उपस्थितीत ‘डी. वाय.पाटील विद्यापीठा’चा शनिवारी दीक्षांत समारंभ

कोल्हापूर : चिदंबरम यांच्या उपस्थितीत ‘डी. वाय.पाटील विद्यापीठा’चा शनिवारी दीक्षांत समारंभ

Next
ठळक मुद्देसंजय डी. पाटील यांची माहिती; शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’ अरुणकुमार अगरवाल यांना ‘डी. एस्सी.’धर्मादाय आयुक्तांकडून कौतुक, एकूण २३० विद्यार्थ्यांना पदवी

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. लिट.’ आणि डॉ. अरूण कुमार अगरवाल यांना ‘डी.एस्सी. पदवी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. लिट.’

कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. प्रकाश बी. बेहेरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी. पाटील म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात शाहू छत्रपती यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या कार्याच्या सन्मार्थ विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार आहे. ‘डी.एस्सी.’ पदवीने सन्मानीत केले जाणारे डॉ. अरूण कुमार अगरवाल हे नवी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता आहेत.

मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता अरूण कुमार अगरवाल 

सध्या ते अपोलो हॉस्पिटलमध्ये नवोपक्रम, शिक्षण आणि क्लीनीकल एक्सलन्सचे वैद्यकीय सल्लागारपदी कार्यरत आहेत. त्यांनी आयुर्विज्ञान क्षेत्रात संशोधन केले आहे. कुलगुरू डॉ. बहेरे म्हणाले, विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यापीठाला नॅकचे सलग दुसऱ्यांदा ‘ए’ मानांकन मिळाले.

विद्यापीठाला उत्कृष्ट तांत्रिकता पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडिया टुडे व नेल्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्चिम विभागात तिसरे आणि राष्ट्रीयस्तरावर १५ वे उत्कृष्ट कॉलेज ठरले. पीएच.डी. प्राप्त केलेले विद्यार्थी विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईश्वरी कुलकर्णी, लखन खुराणा यांना जागतिक बायोएथीक्स दिवसानिमित्त आयोजित केलेल्या लघुचित्रफीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. या पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे वित्त अधिकारी शाम कोले, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आशालता पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अरूण पोवार, प्रा. महादेव नरके, आदी उपस्थित होते.

धर्मादाय आयुक्तांकडून कौतुक

वैद्यकीय व परिचारीका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरीब, गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जाते. गावे दत्तक घेतली आहेत. त्याचे कौतुक धर्मादाय आयुक्तांनी कौतुक केले असल्याचे अध्यक्ष संजय. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त अद्यावत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

एकूण २३० विद्यार्थ्यांना पदवी

यावर्षीच्या दीक्षान्त समारंभात पीएच.डी. सह एकूण २३० विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी, तर बी. शिवरंजनी, ऐश्वर्या कल्याणी, मुबिना फणीबंद, राहूल पाटील, निकुंज शेखदा, कल्याणी कुलकर्णी, डॉ. अभिनव राऊत यांना सुवर्णपदक प्रदान केले जाणार असल्याचे कुलसचिव भोसले यांनी सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: In the presence of Chidambaram, D. Convocation ceremony of YP Patil University on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.