शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाही दसरा सोहळा आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:36 IST

कोल्हापूर : आसुरांचा संहार करणाºया आदिशक्तीचा जागर करणाºया शारदीय नवरात्रौत्सवातील मुख्य सोहळा असलेली विजयादशमी म्हणजेच दसºयाचा सोहळा आज, शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात होणार

कोल्हापूर : आसुरांचा संहार करणाºया आदिशक्तीचा जागर करणाºया शारदीय नवरात्रौत्सवातील मुख्य सोहळा असलेली विजयादशमी म्हणजेच दसºयाचा सोहळा आज, शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. म्हैसूरनंतर संस्थानकालीन दसरा परंपरेची साक्ष देणाºया या सोहळ्यात सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन होईल. यानिमित्त दसरा चौकात सभामंडप उभारण्यात आला आहे.स्त्रीशक्तीचा गौरव, घटाच्या रूपाने होणार सर्जनशीलतेची उपासना आणि देवीचा जागर करणाºया नवरात्रौत्सवाचा मुख्य सोहळा म्हणजे शाही दसरा. देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा दसरा या नवरात्रौत्सवाचे हे आणखी एक वैशिष्ट्य. म्हैसूर, ग्वाल्हेर आणि कोल्हापूर संस्थान या राजघराण्यांना देवीच्या उपासनेशी जोडण्यात आल्याने येथील शाही दसरा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

यानिमित्त आज अंबाबाई आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी निघाली, हे दर्शविणारी रथातील पूजा बांधण्यात येते.सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती असलेली पालखी, जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानीच्या पादुका व शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली पालखी, तसेच गुरुमहाराजांची पालखी भवानी मंडपातून सीमोल्लंघन सोहळ्यासाठी निघतील. दसरा चौकात या पालख्यांचे आगमन होईल. येथे सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे यांच्या हस्ते शमीपूजन होईल. आरती होईल. त्यानंतर सीमोल्लंघनाचा सोहळा होईल.या सोहळ्यानंतर श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगरात व त्यानंतर पंचगंगा नदीघाटावर जाईल. तेथे भक्तांकडून होणारी पूजा स्वीकारत सायंकाळी उशिरा अंबाबाई मंदिरात परतेल. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी काढण्यात येईल.जुना राजवाडा कमानीस मंगल तोरणहिल रायडर्स अ‍ॅन्ड हायकर्स ग्रुपच्या वतीने आज, शनिवारी जुना राजवाड्याच्या नगारखान्याच्या कमानीला सकाळी साडेनऊ वाजता तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व अंजली पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. यावेळी कोल्हापुरचे नाव उज्ज्वल केलेले खेळाडू व कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. आज, शनिवारी होणाºया शाही दसरा सोहळ्यासाठी शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकाच्या कमानीला पानांचे तोरण लावण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)