शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दिल्लीतील ‘पुरातत्त्व’च्या बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 11:31 IST

पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’च्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आज, सोमवारी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्य पुरातत्त्व आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीचा सर्व्हे करून हा पूल ‘पुरातत्त्व’च्या कक्षेबाहेर असल्याचा अहवाल दिल्लीच्या पुरातत्त्व विभाग कार्यालयाकडे दिला आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्दे दिल्लीतील ‘पुरातत्त्व’च्या बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजराशिवाजी पूल: अहवाल चर्चेला आल्यास आज निर्णयाची शक्यता

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’च्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आज, सोमवारी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात राज्य पुरातत्त्व आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीचा सर्व्हे करून हा पूल ‘पुरातत्त्व’च्या कक्षेबाहेर असल्याचा अहवाल दिल्लीच्या पुरातत्त्व विभाग कार्यालयाकडे दिला आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत.दरम्यान, शुक्रवारी (दि. १) आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पुलाला परवानगी देण्याबाबत राज्य महाअभियोक्तांच्या मुंबईतील बैठकीतही त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे बोट दाखवून आपली सुटका करून घेतली.पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित बांधकामाला परवानगी मिळावी, या पार्श्वभूमीवर अडथळा आलेल्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीचे केंद्रीय आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ब्रह्मपुरी टेकडीवर उत्खनन केलेली जागा, तसेच टेकडीची सीमारेषा निश्चित करून तिचे मोजमाप करण्यात आले.त्यानंतर हा पर्यायी शिवाजी पूल प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीपासून सुमारे १०० मीटर अंतराच्या बाहेर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अहवाल तयार करून, त्यावर दोघे सर्व्हेअर तसेच जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी सह्या करून तो दिल्लीच्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात ऐनवेळी पाठविण्यात आला आहे.

त्यामुळे आज, सोमवारच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत हा अहवाल चर्चेत आल्यास त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तो अहवाल चर्चेसाठी न आल्यास त्यासाठी पुन्हा जुलैच्या पहिल्या सोमवार (दि. २) च्या बैठकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आज, सोमवारी होणाऱ्या दिल्लीतील बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणcollectorतहसीलदार