शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कोल्हापूर ‘ सतेज-अमल लढत नक्की

By admin | Updated: September 25, 2014 01:32 IST

कोल्हापूर ‘दक्षिण’चे राजकारण : अमल महाडिक यांचा अखेर ‘भाजप’मध्ये प्रवेश

कोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा व जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक यांनी आज, बुधवारी अखेर भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूणविराम मिळाला. आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ‘गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक’ अशी लढत होईल. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशी चुरशीची लढत होऊन त्यामध्ये पाटील ५७६७ मतांनी विजयी झाले होते. जिल्हा परिषदेत मुलगा अमल याला संधी असूनही सतेज पाटील यांच्या विरोधामुळे अध्यक्षपद मिळू शकले नाही, याचा राग आमदार महाडिक यांना होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक व सतेज पाटील यांचे मनोमिलन झाले; परंतु आमदार महाडिक मात्र त्यापासून अलिप्तच राहिले. तेव्हापासूनच महाडिक गटाकडून विधानसभेच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. या मतदारसंघातून भाजपकडून लढण्यासाठीही सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनीच अमल महाडिक यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला होता. भाजप उमेदवारी द्यायला तयार होता; परंतु ती स्वीकारावी की नाही, याबद्दल महाडिक संभ्रमावस्थेत होते. महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे आमदार असल्याने व तोंडावर राजाराम कारखाना व ‘गोकुळ’ची निवडणूक असल्याने काही राजकीय अडचणी येतील का, असा अंदाज घेण्यात येत होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही आमदार महाडिक यांची भेट घेऊन भाजपकडून निवडणूक लढवू नये, असे आवाहन केले होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तसे सुचविले होते. त्यामुळे महाडिक कोणता निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते; परंतु त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार मुलग्याला भाजपतर्फे रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. आज, बुधवारी सायंकाळी अमल यांचा विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार चंद्रकांतदादा पाटील, सुरेश हाळवणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.‘लोकमत’चे वृत्त...कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांचे नाव पुढे आल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच पहिल्यांदा ११ सप्टेंबरला प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कोल्हापूर विमानतळावर जाऊन भेट घेतली व निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.महाडिक यांच्या राजीनाम्याची शक्यता..अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदार महादेवराव महाडिक हे आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसकडून त्यांच्यावर येणारा संभाव्य दबाव विचारात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या आमदारकीची मुदत २०१६ पर्यंत आहे.सातजणांचे काय?...अमल महाडिक यांच्याशिवाय या मतदारसंघातून भाजपकडून सातजणांनी उमेदवारी मागितली होती. त्यामध्ये प्रा. जयंत पाटील, निवास साळोखे, चंद्रकांत जाधव, राजू माने, माणिक पाटील, प्रताप कोंडेकर, बी. जी. मांगले यांचा समावेश होता. आता अमल यांना उमेदवारी मिळाल्याने हे सर्वजण महाडिक यांनाच पाठिंबा देतात की आणखी काही वेगळी भूमिका घेतात, हे औत्सुक्याचे असेल.एक नजर २००९ च्या निकालावरसतेज पाटील (काँग्रेस) -८६ हजार ९४९धनंजय महाडिक (अपक्ष) -८१ हजार १८२सूर्यकांत पाटील (भाजप) -१० हजार ०८दिग्विजय खानविलकर (अपक्ष)- ७ हजार ८६८‘गोकुळ’चे काय?...कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात (गोकुळ) मध्ये सध्या आमदार महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील व सतेज पाटील यांची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर संघाची निवडणूक होणार आहे. त्यावेळी कदाचित भाजपचेच सरकार सत्तेवर आलेले असेल. त्यामुळे आता विधानसभेला त्यांना मदत करून त्या जोरावर पुन्हा संघाची सत्ता मिळवता येऊ शकेल, असाही विचार त्यांनी केला असल्याचे सांगण्यात येते.