शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: संजय मंडलिक, हसन मुश्रीफ सर्कशीतले वाघ, ठाकरे गटाचा टोला

By भीमगोंड देसाई | Updated: October 3, 2023 15:46 IST

Kolhapur News: हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी टिका केली. हे दोघेही सर्कशीतले वाघ आहेत. त्यांना दात आणि नखेही नाहीत. या दोघांनी पहिल्यांदा इतिहासाचा अभ्यास करावा आणि नंतर ठाकरे यांच्यावर बोलावे अन्यथा गाठ आमच्याशी आहे,

- भीमगोंडा देसाई कोल्हापूर -छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे लंडनमधून आणतो असे सरकारकडून सांगितले जात आहे. ती शिवरायांचीच खरी वाघनखे आहेत का ?  असा प्रश्न युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला. यावर हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी टिका केली. हे दोघेही सर्कशीतले वाघ आहेत. त्यांना दात आणि नखेही नाहीत. या दोघांनी पहिल्यांदा इतिहासाचा अभ्यास करावा आणि नंतर ठाकरे यांच्यावर बोलावे अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, विजय देवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. 

ते म्हणाले, अफझलखान वधावेळी जी वाघनखे, शस्त्रे वापरली होती, त्याबाबत १९१९ पर्यंत स्पष्टता होती. ती शस्त्रे सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती. त्याविषयीच्या नोंदी आहेत. मात्र आता जे व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे राज्य सरकार परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघनखे नाहीत हे स्पष्ट आहे, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. वाघनखे आणण्यास शिवसेनेचा विरोध नाही. मात्र त्यांची सत्यता पडताळणे महत्वाचे आहे. यावेळी सुनील मोदी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.  मुश्रीफांना पुस्तक देणारमंत्री हसन मुश्रीफ,  खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्हयातील गड किल्ल्यांसाठी सत्ता असताना काय काम केले ते प्रथमतः स्पष्ट करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तपासावा. इतिहास संशोधक सावंत यांचे शोध भवानी तलवारीचा या पुस्तकातील वाघनख एक अभ्यास हा धडा वाचावा. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर बोलावे. यासाठी आम्ही इतिहास संशोधक सावंत यांचे शोध भवानी तलवारीचा हे पुस्तक मंत्री मुश्रीफ यांना देणार आहोत, असे देवणे यांनी स्पष्ट केले.

लक्ष विचलीत करण्यासाठी..सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. म्हणून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी ‘वाघनखे’ हा विषय बाहेर काढला आहे. मात्र जनतेला सर्वकाही माहीत आहे. यामुळे येत्या निवडणुकीत हेच वाघनखे यांचे करेक्ट कार्यक्रम करतील, असे पवार यांनी सांगितले.  तिकिटासाठी मातोश्रीवर हेलपाटे आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करणारे संजय मंडलिक हे लोकसभेचे तिकिट मिळवण्यासाठी मातोश्रीवर अनेकवेळा हेलपाटे मारले. त्याचा मी साक्षीरदार आहे. यामुळे मंडलिक यांनी जपून बोलावे, असा इशाराही पवार यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Mandalikसंजय मंडलिकHasan Mushrifहसन मुश्रीफ