शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

कोल्हापूर : ‘समभाव ’ चित्रपट महोत्सव ६ फेब्रुवारीपासून ,‘मावा’ फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 16:52 IST

‘मावा’ कलामहिर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व महिला दक्षता समिती यांच्यावतीने ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘समभाव’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात लिंगभेद व पुरुषत्वावाबतच्या चुकीच्या कल्पना, समलिंगी व्यक्ती व त्यांचे जीवन, तृतीयपंथी व त्यांचे जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलुवरील १६ माहितीपट व चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

ठळक मुद्दे‘समभाव ’ चित्रपट महोत्सव ६ फेब्रुवारीपासून मावा’ फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे आयोजन

कोल्हापूर : ‘मावा’ कलामहिर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व महिला दक्षता समिती यांच्यावतीने ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘समभाव’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात स्त्री किंवा पुरुष म्हणून जगण्याची पारंपारिक चौकट मोडून जगणाऱ्या माणसांनाही सन्मानाने व सुरक्षितपणे जगता यावे. या दृष्टीने लिंगभेद व पुरुषत्वावाबतच्या चुकीच्या कल्पना, समलिंगी व्यक्ती व त्यांचे जीवन, तृतीयपंथी व त्यांचे जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलुवरील १६ माहितीपट व चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

‘मेन अगेन्स व्हायोलन्स अ‍ॅन्ड अ‍ॅब्यूज ’ ही स्त्री-पुरुष समानतेसाठी गेली २५ वर्षे कार्यरत असणारी संस्था अहे. या संस्थेने ‘फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया ’ च्या वतीने दिल्ली , बंगलोर, त्रिचूर, कोलकत्ता, जळगाव आदी ठिकाण दोन दिवसांचा ‘समभाव’ चित्रपट महोत्सव भरवला होता.

आता त्याच धर्तीवर कोल्हापूरातही ‘मावा ’ तसेच एफटीआयआयच्या साथीने व कॅनडा फंड फॉर लोकल इनिशिएटिव्हज व महिला दक्षता समिती व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने हा महोत्सव घेतला जात आहे.

यात लिंगभेद, पौरुषत्वाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, समाजात असणारी लैंगिक विविधता याबाबत यथायोग्य जाणीव निर्मिती करण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांबरोबरच महाविद्यालयीन सज्ञान विद्यार्थी-विद्यार्थीनी, सामाजिक कार्यकर्ते , तरुण सिने निर्माते या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.

याबाबत समाजात मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यानिमित्त चित्रपट व माहीतीपट पाहिल्यानंतर होणारी चर्चा हे या महोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. हा महोत्सव तीन दिवस राम गणेश गडकरी सभागृहात होणार आहे.

लघुपट व चित्रपट दाखवून त्यावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा व विचारविनमय होणार आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन सोसायटी सचिव दिलीप बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

 

टॅग्स :Gay Marriageसमलिंगी विवाहIndian Festivalsभारतीय सण