शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : संभाजी भगत, अमर कांबळे यांना क्रांतीयोद्धा पुरस्कार, विश्वजित कांबळे यांची माहिती, शनिवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:29 IST

युवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणारा क्रांतीयोद्धा पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत व साहित्यीक डॉ. अमर कांबळे यांना जाहीर झाला. रोख दहा हजार रुपये, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित कांबळे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देयुवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणार क्रांतीयोद्धा पुरस्काररोख दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप अण्णाभाऊ साठे जीवन आणि कार्य ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : युवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणारा क्रांतीयोद्धा पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत व साहित्यीक डॉ. अमर कांबळे यांना जाहीर झाला. रोख दहा हजार रुपये, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित कांबळे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.शनिवारी (दि. २३) शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडे पाच वाजता प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड, प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजीव आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी उपराकार लक्ष्मण माने असतील. यावेळी डॉ. मिलिंद आव्हाड लिखित अण्णाभाऊ साठे जीवन आणि कार्य या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.सातारा जिल्ह्यातील लहू येथील संभाजी भगत यांच्यावर लोककलेचे संस्कार झाले. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली. त्यांनी कातळाखालचे पाणी या आत्मचरित्रासह नाटक व गाणी लिहीली आहे. कला क्षेत्रातील .योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

शिरोळ येथील प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी नालंदा प्रशासकीय सेवा अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून बहूजन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे जवळपास ११० विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

या विषयावर त्यांचे लेख व पुस्तके प्रकाशीत असून ते व्याख्यानाद्वारेही विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक