शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

कोल्हापूर : सचिनचा टि शर्ट तर विराटची बॅट, क्रिकेटचे अनोखे प्रदर्शन ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 4:21 PM

सर डोनाल्ड ब्रॅडमन,पाकिस्तानचा सईद अन्वर यांची बॅट, सचिन तेंडूलकरांचा टि शर्ट तर सौरभ गांगुली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, मार्क वॉ, डेसमंड, हेन्स यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या क्रिकेट मधील विविध वस्तू अशा अनोख्या ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी ’ क्रि केट साहित्याच्या प्रदर्शन पाहण्यासासाठी सोमवारी दुसर्या दिवशी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देक्रिकेटचे अनोखे प्रदर्शन ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी कोल्हापूरमध्ये सचिनचा टि शर्ट तर विराटची बॅट

कोल्हापूर : सर डोनाल्ड ब्रॅडमन,पाकिस्तानचा सईद अन्वर यांची बॅट, सचिन तेंडूलकरांचा टि शर्ट तर सौरभ गांगुली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, मार्क वॉ, डेसमंड, हेन्स यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या क्रिकेट मधील विविध वस्तू अशा अनोख्या ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी ’ क्रि केट साहित्याच्या प्रदर्शन पाहण्यासासाठी सोमवारी दुसर्या दिवशी मोठी गर्दी केली होती.शाहू स्मारक भवन येथे पुण्याचे उद्योजक रोहन पाटे व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्लेड्स आॅफ ग्लोरी संग्रहातील जगातील नामांकित क्रिकेट वीरांच्या साहित्याचे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर मध्ये प्रथमच सुरु आहे.

क्रिकेट विश्वबाबात असलेले कुतूहल आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी सकाळ पासूनच शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती. प्रदर्शनात सोमवारी महापौर स्वाती यवलुजे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर उपस्थित होते.

सेल्फीसाठी गर्दी...प्रदर्शनात सचिन तेंडुलकर आणि विरट कोहलीच्या बँटसोबत सेल्फी काढण्याचा वेगळी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोफ अनेकांना आवरता आला नाही. दिवसभर याठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

सर डॉन ब्रँडमन यांच्या बँटचे कुतूहलप्रदर्शनातील सर डॉन ब्रँडमन यांनी त्यांच्या १९४८ च्या कारकीर्द मध्ये वापरलेली बँट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे अनेक जुने जाणकार लोक या बँटचा इतिहास लहान मुले अथवा तरुणांना सांगताना या ठिकाणी दिसत होते.

यासह या ठिकाणी १९७५ ते २०१५ मध्ये झालेल्या ११ विश्वकप विजेत्या संघांनी व संघनायकांनी स्वाक्षरी केलेल्या बॅट, आॅस्ट्रेलियन फलंदाज निल हार्वे याच्या स्वाक्षरीसह बॅट, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, मुथय्या मुरलीधरन यांनी विक्रमी खेळी करताना वापरलेली पॅड्स, जर्सी (टी-शर्ट), टी-२० विश्वविजेता भारत, पाकिस्तान व इंग्लंड संघांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट्स, सौरभ गांगुली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, युवराज, पीटरसन, मार्क वॉ, बोर्डर, डेसमंड, हेन्स, गॉर्डन ग्रिनिज यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या क्रिकेटविषयक वस्तू, माल्कम मार्शलची टोपी, रिचर्डची जर्सी-स्वेटर, डेव्हिड बूनची जर्सी, जावेद मियॉँदादची स्वाक्षरीसह बॅट, राहुल द्रविड, रिचर्डस, कॅलीस, पॉँटिंग यांच्या स्वाक्षरीसह वापरलेल्या क्रिकेटोपयोगी वस्तू, पाकिस्तानचा सईद अन्वर यांनी भारताविरुद्ध चेन्नई येथे १९४ धावा केलेली बॅट. बॉल, स्मृतिचिन्ह यासह अन्य वस्तूंचा समावेश. 

 

टॅग्स :Cricketक्रिकेटkolhapurकोल्हापूर