शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाकरिता ७० लाखांचा निधी, महापालिका विशेष सभेत मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:01 IST

नर्सरी बागेत बांधण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचा दगडी फुटपाथ, लॅँडस्केपिंग, भूमिगत विद्युतवाहिनी, डेकोरेटिव्ह विद्युतखांब, स्ट्रॉम वॉटर सिस्टीम अशा कामांकरिता ७० लाखांचा निधी बुधवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देशाहू समाधिस्थळाकरिता ७० लाखांचा निधी, महापालिका विशेष सभेत मान्यता :‘जिल्हा नियोजन’कडे पाच कोटींचा प्रस्ताव देणार

कोल्हापूर : नर्सरी बागेत बांधण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचा दगडी फुटपाथ, लॅँडस्केपिंग,  भूमिगत विद्युतवाहिनी, डेकोरेटिव्ह विद्युतखांब, स्ट्रॉम वॉटर सिस्टीम अशा कामांकरिता ७० लाखांचा निधी बुधवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

याशिवाय समाधिस्थळाची अन्य कामे पूर्ण करण्याकरिता लागणारा पाच कोटींचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून घेण्यासाठी तसा प्रस्ताव तातडीने सादर करा, अशा सूचना सभेत प्रशासनाला देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.शाहू समाधिस्थळाचे लोकार्पण करण्याकरिता जी कामे आवश्यक आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याकरिता ७० लाखांचा निधी पाहिजे असून, तो मंजूर करण्याकरिता बुधवारी महापौर मोरे यांनी विशेष सभा बोलाविली होती. या सभेत कसलेही आढेवेढे न घेता सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेवरील विषय एकमताने मंजूर केले. शिवाय समाधिस्थळाची अन्य कामे करण्याकरिता जो पाच कोटींचा निधी लागणार आहे, त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा. त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी सर्वच नगरसेवकांनी केली.समाधिस्थळाचे काम रखडल्याबद्दल भूपाल शेटे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत सेंट्रल किचनचा विषय पंधरा दिवसांत महासभेसमोर आणला जातो; मग शाहू समाधिस्थळाबद्दल तितकी तत्परता का दाखविली गेली नाही, अशी विचारणा केली.अशोक जाधव, मेहजबीन सुभेदार यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. माधुरी लाड यांनी जिल्हा नियोजन समितीकडे यापूर्वीच का निधी मागितला नाही, अशी विचारणा केली.यावर खुलासा करताना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी समाधिस्थळाच्या कामात प्रशासनाकडून दिरंगाई झाली नसल्याचा दावा केला. 

निधी कमी पडून देणार नाही : आयुक्तशाहू समाधिस्थळ हा सामाजिक तसेच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वांनाच त्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे समाधिस्थळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी प्रशासनाचीदेखील अपेक्षा आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. एवढेच नाही तर पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतुद करुन देणार असाल तर त्याची निविदा प्रक्रीया देखील आतापासूनच राबविण्याची प्रशासनाची तयारी आहे, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर