शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :पानसरे स्मारक जागेचा प्रश्न लवकरच सोडवू : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:56 IST

कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला लागणारी अतिरीक्त जमिनीचा प्रश्न लवकरच सोडवू, अशी ग्वाही महापौर शोभा बोंद्रे यांनी गुरुवारी कॉ. गोविंद पानसरे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली. यासंदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करुन लवकरच तसा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले.

ठळक मुद्देपानसरे स्मारक जागेचा प्रश्न लवकरच सोडवू : महापौरगोविंद पानसरे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली ग्वाही

कोल्हापूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला लागणारी अतिरीक्त जमिनीचा प्रश्न लवकरच सोडवू, अशी ग्वाही महापौर शोभा बोंद्रे यांनी गुरुवारी कॉ. गोविंद पानसरे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली. यासंदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करुन लवकरच तसा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले.समाजातील तळागाळातील कष्टकरी, श्रमिक, नोकरदार यांच्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी निधीचीही तरतुद करण्यात आली. वास्तुविशारद राजेंद्र सावंत यांनी स्मारकाचे संकल्पचित्र निश्चित केले आहे.

प्रस्तावित आराखड्यात झालेल्या बदलामुळे स्मारक उभारणीसाठी आणखी काही जागा लागणार आहे. त्याकरीता स्मारकाच्या शेजारील मोकळी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचा निर्णय न झाल्याने हे काम रखडले आहे. म्हणून पानसरे संघर्ष समितीच्या सदस्यांनी गुरुवारी महापौर बोंद्रे यांची भेट घेतली.पानसरे यांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे ही कोल्हापूरकरांची इच्छा असून त्याकरीता महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे स्मारकाचे काम रखडले आहे. या तांत्रिक अडचणी दूर करुन कामाला तातडीने सुरवात करावी, अशी विनंती मेघा पानसरे व दिलीप पवार यांनी महापौर बोंद्रे यांना केली.

स्मारकाच्या जागेजवळील विद्युत मंडळाचा एक ट्रान्स्फॉर्मर असून तोही तेथून हटविला पाहिजे अशी सुचना पवार यांनी केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत उपस्थित होते. स्मारकासाठी लागणारी अधिकची जागा देण्याबाबतचा प्रस्ताव सध्या आयुक्तांच्या टेबलवर असून येत्या महासभेत तो मंजूरीसाठी ठेवण्यात येईल, असे सरनोबत यांनी स्पष्ट केले.महापौर बोंद्रे यांना भेटलेल्या संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात सुशीला यादव, रघुनाथ देशिंगे, जमीर शेख, आ. आशा कुकडे, बाबा यादव, एम. बी. पडवळे, उमेश पानसरे, आनंदा गुरव, बळवंत पवार, सदाशिव निकम, विक्रम कदम, मल्हार पाटील यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर