शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

... कोल्हापूरवासिय दचकलेच... कारण थेट आयुक्तच बोलले की; हॅलो... मी आयुक्त बोलतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:28 IST

ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी थेट नागरिकांशी साधला संवाद : कोरोना संदर्भातील सर्वेक्षणाच्या कामाची केली उलटतपासणी

कोल्हापूर : ‘हॅलो... मी आयुक्त बोलतोय.... आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, तुम्हाला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले,’ असा फोन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नागरिकांना केला. थेट आयुक्तांचा फोन आल्यामुळे नागरिकांनाही धक्का बसला, तर काहींची तारांबळ उडाली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यामध्ये महापालिकेचा आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स हे काम करीत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी अचानक राजारामपुरी कुटुंब कल्याण केंद्र येथे भेट दिली. त्यांनी सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला. हे काम योग्य पद्धतीने होते की नाही, यासाठी त्यांनी काही भागांमधील १० नागरिकांना थेट फोन करूनच सर्व्हे झाला की नाही याबाबतची उलटतपासणी केली. ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले. 

महापालिकेच्या सर्वेक्षणाचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याची पडताळणी केली. तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन करून काही नागरिक शहरामध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांची ‘सीपीआर’मध्ये तत्काळ तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर जे नागरिक होम क्वारंटाईन आहेत, तेथे भेट देऊन अथवा त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांची चौकशी करावी. घरोघरी सर्व्हेक्षण करीत असताना ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना तातडीने सीपीआरला पाठवून त्यांची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त