शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पावणेचारशे सरकारी कर्मचाऱ्यांकडून कर्जमाफी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:35 IST

राज्य सरकारने कर्जमाफीत अपात्र केलेल्या ६७६ सरकारी कर्मचारी, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. आतापर्यंत ३७४ जणांकडून ५६ लाखांची वसूल करून सरकारी तिजोरीत जमा केले आहेत.

ठळक मुद्देपावणेचारशे सरकारी कर्मचाऱ्यांकडून कर्जमाफी वसूलसहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश सव्वाकोटी पैकी ५६ लाख सरकारच्या तिजोरीत

कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीत अपात्र केलेल्या ६७६ सरकारी कर्मचारी, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. आतापर्यंत ३७४ जणांकडून ५६ लाखांची वसूल करून सरकारी तिजोरीत जमा केले आहेत.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने जून २०१७ मध्ये केली. निकषास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून कर्जमाफीची रक्कमही बहुतांशजणांना अदा करण्यात आली.

सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसह सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी स्पष्ट सूचना कर्जमाफी निकषात होत्या. तरीही या प्रवर्गातील काही शेतकऱ्यांनी अर्ज करून लाभ घेतल्याचे उघड झाले होते.जिल्ह्यातील ६७२ लाभार्थ्यांची नावे राज्य सरकारने जिल्हा बॅँकेकडे दिली होती. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. पण संबंधित शेतकऱ्यांनी कर्जमाफीची रक्कम खात्यावरून उचल केली होती. त्यामुळे पैसे वसूल कसे करायचे, असा पेच होता.

तरीही जिल्हा बॅँकेच्या यंत्रणेने वसूल मोहीम राबविली. त्यातून ३७४ जणांकडून ५६ लाखांची वसूल झाली आहे. दरम्यान, ६७६ पैकी दोन शेतकऱ्यांनी पैशाची उचल केली नव्हती. त्यामुळे अजून तीनशे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या पैशाची वसुली करावी लागणार आहे.

उर्वरित वसुलीचे बॅँकेसमोर आव्हानसंबंधित शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या पैशाची उचल केल्याने त्यांच्याकडून वसूल कसे करायचे? असा पेच बॅँकेसमोर आहे. त्यातील काहीजणांनी सहकार विभागाकडे तक्रार करून, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असल्याने आपण निकषात बसू शकतो, असा दावा केल्याने वसुलीचे आव्हान बॅँकेसमोर राहणार आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारbankबँकkolhapurकोल्हापूर