शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

कोल्हापूरकडे दुसऱ्यांदा आले वैद्यकीय शिक्षण खाते; मुश्रीफ यांचा जीव अडकला होता 'ग्रामविकास'मध्ये

By विश्वास पाटील | Updated: July 15, 2023 13:02 IST

कोल्हापूरशी संबंधित तीन मंत्र्यांकडे सध्या महाराष्ट्राला सगळे शिक्षण देण्याची जबाबदारी

विश्वास पाटील कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्रीहसन मुश्रीफ यांच्या वाट्याला वैद्यकीय शिक्षण आणि अर्थसाहाय्य या खात्याची जबाबदारी पडली आहे. त्यांचा मात्र ग्रामविकास किंवा सहकार खाते मिळावे, यासाठी प्रयत्न होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांनी यापूर्वी सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खात्याचा (२००० ते २००४) कार्यभार सांभाळताना कोल्हापूरला शाहू महाराज यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. त्यांच्यामुळेच हे महाविद्यालय होऊ शकले.मुश्रीफ यांनी यापूर्वी पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्रिपद, तर कामगार, विशेष साहाय्य. विधी न्याय, जलसंपदा आणि ग्रामविकासमंत्री म्हणून ठसा उमटविणारे काम केले आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. थेट जनतेशी संबंधित खाते मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यामुळेच त्यांना सहकार किंवा ग्रामविकास खाते हवे होते. त्यातही ग्रामविकाससाठीच ते जास्त प्रयत्नशील होते. हे खाते भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील नेते गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खाते मुश्रीफ यांना देऊन ग्रामविकास त्यांच्याकडेच ठेवले आहे. त्यातही खातेवाटप करताना राष्ट्रवादी डोईजड होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून सेस घेऊन त्यातून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याची योजना मुश्रीफ यांनीच सुुरू केली. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग महाविद्यालये व वैद्यकीय शिक्षणाचे धोरण निश्चित करण्याचे काम त्यांच्या नव्या खात्यातर्फे केले जाते. तसा विचार केल्यास नव्या पिढीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे खाते आहे; पण त्यात रस दाखवून काम करायला हवे.

कोल्हापूरकडे सगळे शिक्षण...कोल्हापूरशी संबंधित तीन मंत्र्यांकडे सध्या महाराष्ट्राला सगळे शिक्षण देण्याची जबाबदारी आली आहे. मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण ही खाती आली आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण खाते मिळाल्यावर कोल्हापूरला नवीन अभियांत्रिकी मंजूर करून ते यावर्षापासून सुरूही केले आहे. मुश्रीफ यांनी मनावर घेतले तर शेंडा पार्कात वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरच मंजूर असलेले शंभर खाटांचे नवीन रुग्णालय ते उभे करू शकतात. ‘सीपीआर’वरील ताण कमी करण्यासाठी या रुग्णालयाची गरज आहे.

डॉ. हसन मुश्रीफखानविलकर यांनी कोल्हापूरला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्यावर त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व नेते त्यांना डॉ. खानविलकर म्हणून गमतीने बोलवत असत. आता कोल्हापूरला डॉ. मुश्रीफ म्हणून नवे मंत्री मिळाले आहेत, अशीही चर्चा शुक्रवारी दुपारनंतर सोशल मीडियावर सुरू झाली. भैया माने, युवराज पाटील हे आता ॲपरन घालूनच वावरणार, अशीही टिप्पणी काहींनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफministerमंत्री