शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोल्हापूर : रंगसुरांच्या मैफलीला आला बहर...- ‘रंगबहार’चे आयोजन, दि. वि. वडणगेकर यांना जीवनगौरव प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:38 IST

रविवारच्या प्रसन्न सकाळी निसर्गाचे देणे लाभलेल्या टाउन हॉल म्युझिअम बागेत ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. संगीताच्या साथीने चित्र, शिल्प, ओरिगामी, रांगोळी अशा विविध कलांची मुक्त उधळण करीत कलाकारांनी रसिकांना सर्वांगसुंदर अनुभव दिला. यावेळी दि. वि. वडणगेकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देरंगसुरांच्या मैफलीला आला बहर..‘रंगबहार’चे आयोजनदि. वि. वडणगेकर यांना जीवनगौरव प्रदान

कोल्हापूर : रविवारच्या प्रसन्न सकाळी निसर्गाचे देणे लाभलेल्या टाउन हॉल म्युझिअम बागेत ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. संगीताच्या साथीने चित्र, शिल्प, ओरिगामी, रांगोळी अशा विविध कलांची मुक्त उधळण करीत कलाकारांनी रसिकांना सर्वांगसुंदर अनुभव दिला. यावेळी दि. वि. वडणगेकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर व विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. डॉ. प्रवीण हेंद्रे व संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते दि. वि. वडणगेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजेय दळवी, विजय टिपुगडे, रियाज शेख, विजयमाला पेंटर, आशालता पेंटर, विश्रांत पोवार, आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर, अशोक पालकर, सर्जेराव निगवेकर, धनंजय जाधव, सागर बगाडे, अतुल डाके, संजीव संकपाळ, अमृत पाटील उपस्थित होत्या.‘रंगसुरांच्या मैफली’ची सुरुवात तबलावादक प्रशांत देसाई यांच्या तबलावादनाने झाली. दुसरीकडे चित्र, शिल्प, रंगावलीकारी, ओरिगामी कलाकारांनी आपापल्या कलाविष्काराला सुरुवात केली. कुणी शिल्प बनवत होते, कुणी विविध वस्तूंपासून म्युरल्स साकारली. 

चित्रकारांनी कॅनव्हासवर आपल्या कुंचल्याने रंगरेषांचे फटकारे मारत निसर्गचित्र, पोर्ट्रेट, टाउन हॉल म्युझिअम अशा विविध प्रकारांत आपली चित्रकला साकारली. ‘रंगावली’कार सूर्यकांत पाटील यांनी रांगोळीच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येविषयी जागृती केली; तर अमृत रासम यांनी मुक्त रांगोळी काढली. मंदार वैद्य यांनी ओरिगामी कला सादर केली.एकीकडे नामवंत, नवोदित कलाकारांकडून कलेची मुक्त उधळण, तर दुसरीकडे छंद म्हणून नुकताच हातात घेतलेला ब्रश, त्यातून मनात येईल ती कलाकृती कागदावर रेखाटणारे बालकलाकार असे चित्र पाहावयास मिळाले.

सकाळपासूनच पालकांसमवेत त्यांनी हजेरी लावली होती. आपल्या मनात असलेल्या प्रतिमांना रंगांच्या साहाय्याने वास्तवात उतरविण्यात ते दंग होते. त्यात काहीजण निसर्गचित्रे, तर काही पुस्तकांतील चित्रे जशीच्या तशी काढण्याचा प्रयत्न करीत होते. प्रशांत देसाई यांच्यानंतर शास्त्रीय गायिका गौरी पाध्ये यांनी गायनाविष्कार सादर केला.

चित्रकार नेहा बन्सल, अरिफ तांबोळी, आदिती कांबळे, प्रीतेश चिवटे, सत्यजित पाटील, स्वरूप कुडाळकर, आकाश गाडे, समाधान रेंदाळकर, भाऊसाहेब पाटील, स्वप्निल पाटील यांनी सुरेख चित्रे रेखाटली; तर शिल्पकार म्हणून अजित चौधरी, अभिलाष भालेराव, सागर सुतार, किरण कुंभार, विजय कुंभार, अभिजित कुंभार यांनी व्यक्तिशिल्प साकारले. मांडणशिल्प कलाकार दीपक भुर्इंगडे यांनी साकारले.

रसिकांची गर्दी...या कार्यक्रमाला सकाळी नऊ वाजल्यापासूनच रसिकांनी मोठी गर्दी केली होती. कलाकार साकारत असलेल्या कलाकृती न्याहाळताना त्या रंगरेषांमध्ये हरवून जात होते. मानवी मनाच्या संकल्पना चित्र-शिल्पांतून उतरविणाऱ्या कलाकारांचे वेगळेपण अचंबित केल्याशिवाय राहत नव्हते. खास या कार्यक्रमासाठी अन्य शहरांतील कलाकार व रसिक कोल्हापुरात आले होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक