शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘आरबीआय’च्या धोरणाविरोधात उठाव करा: विद्याधर अनास्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:25 IST

कोल्हापूर : ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला मारक आहे; त्यामुळे सहकारातील लोकांनी याविरोधात उठाव करावा, असा सल्ला राज्य सहकारी बॅँकेचे ...

ठळक मुद्दे ‘आरबीआय’च्या धोरणाविरोधात उठाव करा: विद्याधर अनास्कर‘कर्नाडस बॅँकिंग’तर्फे सहकार बॅँकिंग परिषद

कोल्हापूर : ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला मारक आहे; त्यामुळे सहकारातील लोकांनी याविरोधात उठाव करावा, असा सल्ला राज्य सहकारी बॅँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी रविवारी येथे दिला. सहकारी बॅँकांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवून एकीची भावना बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे कर्नाडस बॅँकिंग रिसर्च अ‍ॅँड डेव्हलपमेंट फौंडेशनतर्फे आयोजित सहकारी बॅँकिंग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रमुख उपस्थिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोकराव सौंदत्तीकर, फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, माधवी कर्नाड, आदींची होती. यावेळी अनास्कर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने परिषदेचे उदघाटन झाले.अनास्कर म्हणाले, ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला पोषक नसून ते मारक आहे. त्यामुळे याविरोधात आवाज उठवून आंदोलन करण्याची तयारी सहकारी बॅँकांनी केली पाहिजे.

बॅँकिंग हे खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांना समजेल अशा भाषेत असले पाहिजे. परंतु ‘आरबीआय’च्या लोकांना खरोखरच बॅँकिंग येतेय का असा प्रश्न पडतो.सहकारी बॅँकांच्या सक्षमीकरणासाठी संचालकांनी आपापसांतील मतभेद चार भिंतींच्या आत ठेवावेत, निवडणुकीत एकमेकांवर आरोप करताना बॅँकेला लक्ष्य करू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता माझी संस्था चांगली आहे याची शपथ संचालकांनी घेतली पाहिजे, असा सल्लाही अनास्कर यांनी यावेळी दिला.विजय ककडे म्हणाले, सहकाराने नेहमीच दुसºयांना मदतीची भूमिका घेतली आहे. परंतु चांगल्याचे कौतुक होत नाही. त्यामुळे सहकार आता दोलायमन स्थितीत असल्याचे दिसत आहे.ओऊळकर म्हणाले, ‘आरबीआय’ची धोरणे ही सहकाराविरोधात आहेत. परंतु आता सतीश मराठे यांच्या रूपाने ‘आरबीआय’मध्ये सहकाराची बाजू मांडणारा मराठी माणूस गेल्याने सहकाराविषयक गैरसमज नक्कीच दूर होण्यास मदत होईल.

‘एनपीए’चे निकष बदलावेत‘एनपीए’चे निकष येण्यापूर्वी कुठली बॅँक बुडली होती काय? असा प्रश्न उपस्थित करत आपल्या सोयीनुसार ‘आरबीआय’कडून त्याची अंमलबजावणी झाली असून खरोखरच त्याचा अभ्यास झाला काय हे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे आता ‘एनपीए’चे निकष बदलण्याची गरज असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

वार्षिक सभेत संचालक आरोपीच्या पिंजऱ्यांतसहकारातील वार्षिक सभा म्हणजे संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे असाच आहे. तसेच हे संचालकही वर्षातील दोन तास सभेसाठी देऊन ती कशी हाताळायची या अविर्भावात असतात. ‘गोकुळ’ची सभा काही मिनिटात गुंडाळल्याने पुन्हा हेच घडल्याचे अनास्कर यांनी सागिंतले.

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर