शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रवेश परीक्षांसाठी ‘प्रश्न बँक’ तयार, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात २४ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 17:59 IST

शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दि. २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक (क्वेश्चन बँक) तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवेश परीक्षांसाठी ‘प्रश्न बँक’ तयारशिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात २४ केंद्रेआॅनलाईन पद्धतीने होणार परीक्षा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दि. २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक (क्वेश्चन बँक) तयार करण्यात आली आहे.विद्यापीठातर्फे दरवर्षी एम. ए., एम. एस्सी जिओग्राफी, एम. ए. मास कम्युनिकेशन, एम. एस्सी. अल्कोहल टेक्नॉलॉजी, बी.जे., एम. जे., एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी, अ‍ॅग्रो केमिकल अ‍ॅण्ड पेस्ट मॅनेजमेंट, एम. एस्सी. जिओलॉजी, बी. लिब., एम. लिब., एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध २९ विषयांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी सात अभ्याक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.विद्यापीठाच्या परीक्षा विषयक कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याच्या उद्देशाने यावर्षीपासून २९ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार दि. २२ ते २९ मे दरम्यान आॅनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होतील.

फॅक्ल्टी चेंज ही परीक्षा दि. २३ मे रोजी आॅफलाईन पद्धतीने होईल. आॅनलाईन परीक्षज्ञ या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संगणक प्रयोगशाळांमध्ये होणार आहे. परीक्षासाठी कोल्हापूरमध्ये १३, सांगलीत पाच आणि सातारा जिल्ह्यात सहा केंद्रे आहेत. 

यावर्षी पहिल्यांदाच सर्व प्रवेश परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी २२ अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक तयार झाल्या आहेत. उर्वरीत अभ्यासक्रमांबाबतची कार्यवाही सुरू आहे. परीक्षा केंद्रांसह तेथील समन्वयकांची निश्चिती झाली आहे. काही अडचण निर्माण झाल्यास त्यावर पर्याय म्हणून ओएमआर शीटस्ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.-महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  1.  प्रवेश परीक्षा होणारे अभ्यासक्रम : २९
  2. एकूण परीक्षा केंद्रे : २४

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर