शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  कूळहक्काचा वाद तब्बल ४६ वर्षांनी तडजोडीने मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:56 IST

नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे कूळहक्काचा वाद तब्बल ४६ वर्षांनी तडजोडीने मिटला महसूल न्यायाधिकरणासमोर निर्णय

कोल्हापूर : नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.नाटोली येथील शिवाजी एकनाथ कुलकर्णी यांची दोन हेक्टर जमीन ही चेंदू राऊ कुरणे हे कसत आहेत. कुरणे व कुलकर्णी या दोघांमध्ये १९७२ पासून या कूळहक्काच्या जमिनीसंदर्भात महसूल न्यायाधिकरणात दावा सुरू आहे.

या जमिनीच्या किमतीहून अधिक खर्च या दाव्याच्या माध्यमातून झाला, असे म्हणणे चुकीचे होणार नाही; कारण सुरुवातीला कुरणे यांच्यासोबत ५० अर्जदार झाले; तर दुसऱ्या बाजूला शिवाजी कुलकर्णी यांच्यासोबत पाच अर्जदार समाविष्ट झाले.

एकूण ५६ अर्जदारांचे हे प्रकरण अद्याप मिटले नव्हते; परंतु न्यायाधिकरणाचे सचिव पोतदार यांच्यासमोर मंगळवारी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होऊन हा विषय तडजोडीने संपला.

यामध्ये १ लाख ८ हजार ६२० रुपये हे मूळ मालकांना कूळ असलेल्या कुरणे यांनी दिले. त्यामुळे बरीच वर्षे ताणलेला हा दावा चांगल्या प्रकारे संपल्याचा नि:श्वास पोतदार यांनी व्यक्त केला.अशा प्रकारे कूळहक्काचे वाद हे अहंकाराचे व प्रतिष्ठेचे न करता लोकांनी सामंजस्याने सोडविल्यास वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचेल, असे पोतदार यांनी सांगितले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

वर्षभरात १२० प्रकरणे निकालीमहसूल न्यायाधिकरण हे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी आहे. या प्राधिकरणाकडे सुमारे १५०० प्रकरणे दाखल असून, त्यांपैकी वर्षभरात १२० प्रकरणे निकाली निघाली आहेत, असे पोतदार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर