शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, पुणे संघ अजिंक्य

By admin | Updated: November 9, 2015 23:19 IST

चुरशीचे सामने : बाबासाहेब चितळे चषक राज्य व्हॉलिबॉल स्पर्धा

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे झालेल्या बाबासाहेब चितळे चषक ४२ व्या कनिष्ठ राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाच्या संघाने, तर मुलांच्या गटामध्ये पुणे विभागाच्या संघाने विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटना, सांगली जिल्हा संघटना व बाबासाहेब चितळे चॅरिटेबल टस्ट भिलवडी यांच्या विद्यमाने भिलवडी (ता. पलूस) येथे ‘जानकीबाई चितळे क्रीडा नगरी’त सलग तीन दिवस या स्पर्धा झाल्या. मुलींच्या गटात अत्यंत चुरशीच्या व रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूर विभागाच्या संघाने पुणे विभागाच्या संघाचा ३-० असा (२५-१८, २५-२१, २५-१३) पराभव केला. मुलांच्या गटात पुणे विभागाच्या संघाने नागपूर विभागाच्या संघाचा ३-१ अशा सेटने (२५-२१, २०-२५, २५-१५, २५-१४) पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या लढतीत मुलींच्या गटात मुंबई विरुध्द नागपूर या लढतीत मुंबईने २-० असा विजय मिळवला. मुलांच्या गटात लातूर विरुद्ध कोल्हापूर या लढतीत लातूरने २-० अशी बाजी मारली. मुलींच्या कोल्हापूर संघात समीक्षा किणीकर, प्रज्ञा वरेकर, नेहा शिंदे, ऋतुजा कदम, कल्याणी भोळे, ऋतुजा ऐतवडे, तर पुणे विभागाच्या गायत्री भैरवकर, वैष्णवी कोदरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलांच्या पुणे संघातील निनाद बोंगाणे,प्रीतम जाधव, रवी भगत यांच्या समन्वयाने विजयश्री खेचून आणली. नागपूर संघाच्या प्रणय वाबीटकर, आशिष शर्मा, मधुर मरस्कोल्हे यांनी एकाकी, पण चिवटपणे झुंज दिली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय सहसंचालक नरेंद्र सोपल, काकासाहेब चितळे यांच्याहस्ते विजेत्या संघास चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.