शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कोल्हापूर : कठुआ, उन्नाव येथील अत्याचाऱ्याच्या ‘भारिप’तर्फे निषेध,  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:25 IST

कठुआ, उन्नाव व सुरत येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराचा भारिप बहुजन महासंघातर्फे शुक्रवारी निषेध करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ...’अशा घोषणा करणाºया भाजप सरकारच्या काळातच मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची टीका यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्दे कठुआ, उन्नाव येथील अत्याचाऱ्याच्या ‘भारिप’तर्फे निषेधकोल्हापूर  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : कठुआ, उन्नाव व सुरत येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराचा भारिप बहुजन महासंघातर्फे शुक्रवारी निषेध करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ...’अशा घोषणा करणाºया भाजप सरकारच्या काळातच मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची टीका यावेळी करण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास ‘भारिप’चे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. यानंतर सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, कठुआ, उन्नाव प्रकरणांची लवकर सुनावणी करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालयाची स्थापना करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास विरोध करुन आरोपींच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे जम्मू काश्मिर सरकारमधील भाजपचे मंत्री लालसिंग चौधरी व चंद्रप्रकाश गंगा यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागण्यांची दखल घेऊन आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.आंदोलनात शहराध्यक्ष संजय गुदगे, मल्लिाकार्जुन पाटील, राजन पिडाळकर, विमल पोखर्णीकर, मारुती मानकर, संभाजी लोखंडे, किशोर सोनटक्के, संभाजी लोखंडे आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणkolhapurकोल्हापूर