शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी प्राध्यापक करणार ‘मौनधरणे’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:24 IST

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून प्राध्यापक संघटनेशी चर्चा करावी. त्यासह सरकारला जागे करण्यासाठी महात्मा गांधी जयंती दिनी आज, मंगळवारी सकाळी १0 वाजता जिल्ह्यातील प्राध्यापक ‘मौनधरणे’आंदोलन करणार आहेत.उच्च शिक्षणातील भरतीबंदी उठवावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एम्फुक्टो) आणि ...

ठळक मुद्देउच्च शिक्षणातील भरतीबंदी उठवावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनामागील भूमिका, आंदोलनाचे स्वरूप, शासनाची नकारात्मक मनोवृत्ती याबाबत मार्गदर्शन केले.

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून प्राध्यापक संघटनेशी चर्चा करावी. त्यासह सरकारला जागे करण्यासाठी महात्मा गांधी जयंती दिनी आज, मंगळवारी सकाळी १0 वाजता जिल्ह्यातील प्राध्यापक ‘मौनधरणे’आंदोलन करणार आहेत.

उच्च शिक्षणातील भरतीबंदी उठवावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एम्फुक्टो) आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाच्या सातव्या दिवशी सोमवारी टाऊन हॉल बागेत झालेल्या सभेत प्राध्यापकांनी ‘मौनधरणे’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी सकाळी १0 ते दुपारी १२ या वेळेत आंदोलन केले जाणार आहे. यावेळी सुटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर यांनी आंदोलनामागील भूमिका, आंदोलनाचे स्वरूप, शासनाची नकारात्मक मनोवृत्ती याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष अरुण पाटील, सहकार्यवाह अरुण शिंदे, शिवाजी सुतार यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित प्राध्यापकांनी मुख्यमंत्री आणि सरकारचा निषेध केला.संघटनेशी चर्चा करावीया सभेत एम्फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी या बेमुदत कामबंद आंदोलनाचा आढावा घेतला. राज्यभरातील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाल्याने विविध महाविद्यालयांतील अध्यापन आणि इतर उपक्रम बंद पडले आहेत. शासनाने उच्चशिक्षणाची गुणवत्ता व स्वायत्तता अबाधित राखण्यासाठी तत्काळ संघटनेशी चर्चा करावी. मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून प्राध्यापक संघटनेशी चर्चा करावी. त्यासह सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी काळ्या फिती लावून प्राध्यापक हे मौनधरणे आंदोलन करणार आहेत. त्यात शहरातील प्राध्यापक सहभागी होणार असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप