शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कोल्हापूर : शहीद जवानांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्राधान्य : लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 11:39 IST

टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे भारतीय सेनेतर्फे आयोजित माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा आर्मी सेंटरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग ते बोलत होते. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४००० माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी वीरमाता व पत्नींचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्दे जवानांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्राधान्य : लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंगमाजी सैनिकांचा मेळावा, ४००० माजी सैनिक उपस्थित

कोल्हापूर : भारतमातेच्या रक्षणासाठी अनेक जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात. त्यांच्या पश्चात शहीद जवानांच्या मुलांना दर्जेदार, उच्च शिक्षण मिळण्यासाठी शासकीय व खासगी शाळांत प्राधान्य देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा आर्मी सेंटरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग यांनी रविवारी केले.टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे भारतीय सेनेतर्फे आयोजित माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४००० माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी वीरमाता व पत्नींचा सन्मान करण्यात आला.सिंग म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आर्मीच्या वतीने अद्ययावत दवाखाने सुरू आहेत. मात्र काही माजी सैनिकांना आरोग्याच्या कारणास्तव संबंधित दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येतात. अशा माजी सैनिकांसाठी प्रथम राजस्थानमध्ये आर्मीच्या वतीने ‘मोबाईल (व्हॅन) हॉस्पिटल’ ही योजना सुरू केली आहे.

या मोबाईल व्हॅनमार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवितो. ही सेवा सध्या गोव्यात सुरू आहे. तिला प्रतिसाद पाहता ही योजना भविष्यात कोल्हापुरातही सुरू केली जाईल.मेजर जनरल प्रीती सिंग म्हणाले, माजी सैनिकांना एकत्र करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेती, आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या दैनंदिन गरजा या मेळाव्याच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत.

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे रविवारी माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्यात बोलताना लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग. समोर माजी सैनिक व त्यांचे कुटुंंबीय उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार)याप्रसंगी माजी सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, राज्य सैनिक कल्याण अधिकारी सुहास जतकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कर्नल आर. एस. लेहाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, कर्नल विजयसिंह गायकवाड, मेजर संजय शिंदे, ब्रिगेडियर पी. एस. राणा, लेफ्टनंट कर्नल मिलिंद शिंदे यांच्यासह माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.वीरपत्नी, वीरमातांचा बांध फुटलामाजी सैनिकांच्या या मेळाव्यात जिल्ह्यातील ३० वीरपत्नी व वीरमातांचा सन्मान करण्यात आला. लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग यांच्या हस्ते सत्कार करताना या वीरमाता, पत्नींना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. अशा भावनिक वातावरणात त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे रविवारी माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्यात जिल्ह्यातील वीरपत्नी व वीरमातांचा सन्मान करताना लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग. (छाया : नसीर अत्तार)

यामध्ये वीरपत्नी सुवर्णा संभाजी पाटील, संगीता विजय पाटील, शोभा लक्ष्मण आॅल्का, शर्मिला नारायण तुपारे, रूपाली महादेव तुपारे, सुवर्णा सुभाष कदम, छाया मारुती पाटील, रूपाली सुभाष भोळे, राजश्री कुंडलिक माने, अश्विनी सात्ताप्पा पाटील, पूनम प्रवीण येलकर, संगीता दशरथ जाधव, अलका क्रिष्णा रांजगाने, सुरेखा भाऊसो पोवार, अर्चना अर्जुन बिरंजे, जयश्री जयवंत चौगुले, मंगला अप्पाजी कदम, छाया शामराव शिंदे, मनीषा उत्तम देसाई, सुवर्णा शिवाजी मगदूम, वृषाली महादेव तोरस्कर आणि निर्मला गोपाल निउंगरे यांचा; तर शोभा माने, मनीषा सूर्यवंशी, सुलोचना पाटील, छाया इंगळे, यमुनाबाई बागडी, आक्काताई साबळे, यशोदा पाटील या वीरमातांचा सन्मान करण्यात आला.

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे रविवारी माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्यात माजी सैनिकांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग. (छाया : नसीर अत्तार) 

दोन दिवस आरोग्य शिबिरया मेळाव्यात माजी सैनिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये विविध ठिकाणांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून माजी सैनिकांची तपासणी करण्यात आली. हे आरोग्य शिबिर दोन दिवस सुरू राहणार आहे.

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे रविवारी माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्यात माजी सैनिकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार) 

एस.टी. भरून माजी सैनिकमाजी सैनिक मेळाव्यासाठी काही गावांतून स्वतंत्र एस. टी. बसमधून माजी सैनिक कुटुंबीयांसोबत सकाळी येत होते. माजी सैनिकांना माहिती देण्यासाठी या मेळाव्यात बॅँक, महसूल, महावितरण, शेती अवजारे, दुचाकी व चारचाकी गाड्यांसह सुमारे तीसहून अधिक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते. या ठिकाणी त्यांना त्यांना सविस्तर माहिती पुरविण्यात येत होती.सायंकाळी पाचपर्यंत हा मेळावा सुरू होता. यासह सर्वांसाठी जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर