शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर : राज्य बालनाट्य स्पर्धा उद्यापासून, आठ दिवसांत ३९ नाटकांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 15:11 IST

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित १६ वी राज्य बालनाट्य स्पर्धा उद्या, शुक्रवारपासून केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे.

ठळक मुद्दे राज्य बालनाट्य स्पर्धा उद्यापासूनआठ दिवसांत ३९ नाटकांचे सादरीकरण

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित १६ वी राज्य बालनाट्य स्पर्धा उद्या, शुक्रवारपासून केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी बालरंगभूमीची सेवा केल्याबद्दल सलीम शेख व रतन्नुम शेख या रंगभूषा व वेशभूषाकार दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुर्इंगडे उपस्थित असतील.

सलीम शेख व रतन्नुम शेखतब्बल आठ दिवस रोज सकाळी नऊ ते दुपारी पाच या वेळेत या स्पर्धा पार पडतील. यात कोल्हापूर विभागातून आजरा, हातकणंगले, इचलकरंजी, गडहिंग्लज, सांगली, मिरज, रत्नागिरी, चिपळूण अशा विविध तालुक्यांतून व जिल्ह्यांतून जवळपास ३९ बालनाटके सादर होणार आहेत.

कोल्हापूर विभागाने यंदा स्पर्धेत कोल्हापूर व पुणे केंद्रे स्वतंत्र करावीत, असा प्रस्ताव पाठविला होता. मात्र त्यावर निर्णय न झाल्याने यंदाही या दोन्ही केंद्रांवरून संयुक्तिकरीत्या विजेते संघ जाहीर केले जातील. तरी शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी या बालनाट्यांचा आस्वाद घ्यावा व बालकलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन समन्वयक प्रशांत जोशी यांनी केले आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे (सकाळी नऊ वाजल्यापासून)शुक्रवार (दि. ४) : पाऊल पडते पुढे (आदर्श गुरुकुल विद्यालय, हातकणंगले), तप्त दाही दिशा (आजरा हायस्कूल), एक घर २१ व्या शतकातील (अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल, आजरा).शनिवार (दि. ५) : भेट (आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान, इचलकरंजी), केल्याने होत आहे रे (डॉ. बापट बालशिक्षण मंदिर, सांगली), सावधान, पर्यावरण संपत चालले हो (ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, पेठवडगांव).रविवार (दि. ६) : जागर (गुरुदेव चैतन्यस्वरूप गुरुकुल, सांगली), मनू माझा भावला (हिंदकेसरी मारुती माने विद्यालय, कवठेपिरान), गोष्टीची गोष्ट (इंद्रधनू कलाविष्कार संस्था, मिरज), जांभूळवाडा (डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण), मायमराठी (शेठ चतुरलाल गणपतचंद शहा विद्यामंदिर, सांगली).सोमवार (दि. ७) : म्हॅ... (रसिक कलामंच, कोल्हापूर), लेफ्ट राईट लेफ्ट (हिंदकेसरी मारुती माने विद्यालय, कवठेपिरान), जादूचा शंख (पं. दीनदयाल विद्यालय, आजरा), भाकरीच्या शोधात (प्रज्ञान कला अकादमी, वारणानगर), गोष्ट पछाडलेल्या वाड्याची (राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, सांगली), बसराची ग्रंथपाल (न्यू होराईझन स्कूल, औरनाळ, गडहिंग्लज), श्री श्री १०८ दगड (रुद्रांश अकॅडमी, कोल्हापूर).मंगळवार (दि. ८) : नवे गोकुळ (समर्थ रंगभूमी, रत्नागिरी), मरी आयच्या नावाने (खवाटे हायस्कूल, मिरज), प्रयत्नांती परमेश्वर (सिटी हायस्कूल सांगली), मोबाईल मोबाईल (सिटी इंग्लिश स्कूल, सांगली).बुधवार (दि. ९) : राक्षसमाळ (पटवर्धन हायस्कूल, सांगली), चोर चोर पक्का चोर (गोसालिया हायस्कूल, सांगली), सर, तुम्ही गुरुजी व्हा (शेठ मूलचंद मालू इंग्लिश स्कूल, सांगली), हिरकणी (पुरोहित कन्या प्रशाला, सांगली), न्याय हवा न्याय (आठवले विनय मंदिर, सांगली), जंगल स्कूल (श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली), अकलेने लावली राज्याची वाट (उद्योगरत्न वेलणकर विद्यालय, सांगली).गुरुवार (दि. १०) : काऊमॅऊ (सुंदराबाई मालू इंग्लिश मीडिअम स्कूल, सांगली), ठोंब्या ठोंबीची गोष्ट (शिंदे अकॅडमी, कोल्हापूर), हलगी सम्राट (श्री बालाजी इंग्लिश मिडिअम स्कूल, इचलकरंजी), मृत्यूचे झाड (श्री बालाजी माध्यमिक विद्यालय, इचलकरंजी), खेळातील गेम (विनायकराव पटवर्धन कन्या प्रशाला, तासगाव), एक दिवसाचा पांडुरंग (सरस्वती वाचनालय, शहापूर-बेळगाव), तस्मैश्री गुरवे नम: (नव कृष्णा व्हॅली गुरुकुल, मिरज).शुक्रवार (दि. ११) तुम्हाला तुमचा देश कसा हवाय? श्री तुकाराम माळी तालीम मंडळ, कोल्हापूर), प्रोजेक्ट मैत्रबंध (सस्नेह कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, सांगली), आजकाल (विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर)

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर