शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तालयास ठेंगा, पिंपरी-चिंचवडला मुखमंत्र्यांनी दिली मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:22 IST

कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार अशी हवा तयार केल्यानंतर अचानकपणे घूमजाव करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देऊन कोल्हापूरला ठेंगा दाखविला. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या पोलीस आयुक्तालयास ठेंगापिंपरी-चिंचवडला मुखमंत्र्यांनी दिली मान्यता

कोल्हापूर : कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार अशी हवा तयार केल्यानंतर अचानकपणे घूमजाव करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देऊन कोल्हापूरला ठेंगा दाखविला. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याद्वारे कोल्हापूरवासीयांच्या तोंडाला पाने पुसली गेल्यामुळे निराशा पसरली आहे.गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली होती. त्यामध्ये कोल्हापूरसह पिंपरी-चिंचवड व मीरा-भार्इंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासन विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने नुकतेच अकोला येथे पोलीस आयुक्तालय केले आहे. कोल्हापूर पोलीस प्रशासन गेली २० वर्षे पोलीस आयुक्तालय होण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार असे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोल्हापूरवासीयांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या.

मंगळवारी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली.

नवीन २ हजार ६३३ पदे निर्माण करणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या वीस वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या कोल्हापूरला पोलीस आयुक्तालयाबाबत ठेंगा दाखविला. शासनाच्या या निर्णयाबद्दल कोल्हापूरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त