शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कोल्हापूर : दोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोल १३.३०, तर डिझेल ९.५३ रु. कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:24 IST

इंधन दरवाढ झाली की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोलचा प्रतिलिटर दर रु. १३.३० ने, तर डिझेलचा दर रु. ९.५३ ने कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईतही दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल झाले स्वस्तदोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोल १३.३०, तर डिझेल ९.५३ रु. कमी

कोल्हापूर : इंधन दरवाढ झाली की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोलचा प्रतिलिटर दर रु. १३.३० ने, तर डिझेलचा दर रु. ९.५३ ने कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईतही दिलासा मिळाला आहे.पेट्रोल तर सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे. कारण प्रत्येकाकडे दुचाकी असते. त्यात पेट्रोल भरले तरच ती चालते, तर डिझेल ही बाब मालवाहतुकीशी संबंधित आहे. धान्य, भाजीपाला, आदी वस्तू आणण्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना डिझेल लागते. त्यामुळे तसे बघता दोन्ही इंधन सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचेच विषय आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे.याचा फायदा होऊन संपूर्ण डिसेंबर महिन्यात इंधन दर कमीच राहतील, असा कयास पेट्रोल डिलरांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांनी दोन महिन्यांनी का होईना जनतेला दिलासा दिला आहे.

दोनच महिन्यांपूर्वी अर्थात २ आॅक्टोबर रोजी पेट्रोल ९१ रुपये २२ पैसे, तर डिझेल ७८ रुपये ७२ पैसे इतके होते. रविवारी (दि. २) हेच दर पेट्रोल ७७ रुपये ९२ पैसे, तर डिझेल ६९ रुपये ५३ पैसे इतके आहेत. त्यात पेट्रोल १३ रुपये ३० पैसे, तर डिझेल ९ रुपये ५३ पैशांनी कमी झाले आहेत. आज, सोमवारी पेट्रोल ७७ रु. ६३ पैसे, तर डिझेल ६८ रु. ८५ पैसे असे दर राहणार आहेत.

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. यासह दरही कमी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यात राज्य सरकारने जर कर कमी केले तर आणखी दर कमी येतील. संपूर्ण डिसेंबर महिन्यात दर कमीच राहतील असा अंदाज आहे.- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असोसिएशन 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर