शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्राथमिक शाळांसाठी १९ कोटींचा लोकसहभाग : अंबरीश घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 11:49 IST

गेल्या दीड वर्षांमध्ये लोकसहभागातून १९ कोटी रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. जे. पी. नाईक ‘माझी शाळा, समृद्ध शाळा’ उपक्रमाला मुदतवाढ देण्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि १५ जानेवारीला जिल्हास्तरीय मूल्यमापन होणार आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शाळांसाठी १९ कोटींचा लोकसहभाग : अंबरीश घाटगे जे. पी. नाईक उपक्रमाला मुदतवाढ

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षांमध्ये लोकसहभागातून १९ कोटी रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. जे. पी. नाईक ‘माझी शाळा, समृद्ध शाळा’ उपक्रमाला मुदतवाढ देण्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि १५ जानेवारीला जिल्हास्तरीय मूल्यमापन होणार आहे.घाटगे म्हणाले, बाराही तालुक्यांमध्ये या उपक्रमाबाबत कार्यशाळा घेतल्या. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या आर्थिक वर्षात १९ कोटी आणि गेल्या सहा महिन्यांत ३ कोटी रुपयांचा लोकसहभाग मिळाला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात २0 कोटी रुपयांचा लोकसहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामपंचायतींना शिक्षणावर २५ टक्के खर्च करणे बंधनकारक असल्याचे सांगून त्यानुसार आराखडे बदलून देण्यास सांगितले आहे. याची योग्य अंमलबजावणी झाली, तर शाळांचा चांगला विकास होईल. ९७ शाळा डिजिटल होणे बाकी असून, प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे आहेत, मात्र त्यांची अवस्था चांगली नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुलामुलींसाठी प्रत्येकी एक चांगले स्वच्छतागृह असावे, असा प्रयत्न आहे.

प्रत्येक शाळेमध्ये ३0 हजार रुपये खर्चून प्रयोगशाळा तयार करण्याचाही संकल्प आम्ही केला असून, शाळा खोल्या निर्लेखनाची गरज आहे त्याच ठिकाणी परवानगी दिल्याचे घाटगे यांनी सांगितले.

गतवर्षी शाळा दुरुस्तीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८ कोटी रुपयांचा निधी दिला असून, त्यातून २४0 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ, अधिकाऱ्यांचे याकामी सहकार्य लाभल्याचे घाटगे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाkolhapurकोल्हापूर