शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राज्याच्या रेशन व्यवस्थेत आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:24 IST

बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशन व्यवस्थेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने केलेले काम दिशादर्शक आहे. त्यामुळे शिक्षणातील लातूर पॅटर्नप्रमाणे राज्यात रेशन व्यवस्थेमध्ये आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ राबविला जाईल,

ठळक मुद्देरेशन दुकानदारांचा राज्यस्तरीय सन्मान मेळावा-वसतिगृहातील विद्यार्थी, वृद्धाश्रमातील वृद्धांना रेशनवर धान्य

कोल्हापूर : बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशन व्यवस्थेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने केलेले काम दिशादर्शक आहे. त्यामुळे शिक्षणातील लातूर पॅटर्नप्रमाणे राज्यात रेशन व्यवस्थेमध्ये आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ राबविला जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे केली. शासकीय वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना व वृद्धाश्रमातील वृद्धांना रेशनवर दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे राज्यस्तरीय सन्मान मेळावा व ‘एईपीडीएस’ प्रणाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी विश्वंभर बसूू, कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, महाराष्ट राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, राज्य संघ सल्लागार मंडळाचे उपाध्यक्ष राजेश आंबूसकर, कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष रवींद्र मोेरे, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पुणे विभागीय उपायुक्त (पुरवठा) नीलिमा धायगुडे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांची होती.

मंत्री बापट म्हणाले, रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून टप्प्याटप्प्याने त्या मार्गी लावल्या जातील. त्याचबरोबर रेशन दुकानदार हा मालक असल्याने त्याला पगाराऐवजी उत्पन्नानुसार मानधनात वाढ करून त्याला सक्षम केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

विश्वंभर बसू यांनी राज्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवून देण्याची मागणी मंत्री बापट यांच्याकडे केली. डी. एन. पाटील यांनी रेशन दुकानदारांना सरकारने प्रतिक्विंटल १५० ऐवजी २५० रुपये कमिशन द्यावे, दुकानदाराला जागेचे भाडे द्यावे व माथाडी कामगार कायद्यानुसार दुकानातील अकुशल कामगाराला वेतन द्यावे अशा मागण्या केल्या.चंद्रकांत यादव यांनी रेशनवर १४ वस्तू विक्री करण्याची परवानगी मिळावी, तसेच जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘पीडीएस’ भवन बांधण्याची मागणीही त्यांनी केली. महेश जाधव यांनी बायोमेट्रिक प्रणालीमुळे काळाबाजार थांबला असून, पारदर्शक कारभार होत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी सुभेदार यांनी प्रशासन व रेशन दुकानदार यांनी एकत्र काम केल्याने जिल्हा राज्यात अव्वल आल्याचे सांगितले. विवेक आगवणे यांनी बायोमेट्रिक रेशनमधील कोल्हापूरच्या वाटचालीविषयीची माहिती दिली.विवेक आगवणे यांचे कौतुकबायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा क्रमांक एकवर कायम ठेवल्याबद्दल मंत्री बापट यांनी भाषणात जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आजच्या कार्यक्रमात मला जेवढ्या टाळ्या मिळाल्या नाहीत, त्याच्या दुप्पट टाळ्या या आगवणे यांंना मिळाल्या असून, यावरून त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा लक्षात येत असल्याचे गौरवोद्गार काढून आगवणे बहुतेक ‘आमदार’ होणार अशी कोटीही त्यांनी केली. 

‘बायोमेट्रिक’मुळे ३०० टन धान्याची बचतबायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे वर्षाला सुमारे ३०० टन धान्य वाचल्याने जवळपास १० कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. तर रॉकेलमधून दोन ते तीन कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. राज्यातही तीन लाख ८० हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याने सुमारे दोन हजार कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या शिल्लक पैशातून दुकानदारांचे कमिशन वाढविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केल्याचे मंत्री बापट यांनी सांगितले.तालुक्यांचा गौरवबायोमेट्रिक रेशनिंगमध्ये ‘एईपीडीएस’प्रणालीद्वारे९० टक्क्याच्या पुढे धान्याचे वितरण केल्याबद्दल कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहरासह आजरा, कागल, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा, गडहिंग्लज, करवीर, हातकणंगले, चंदगड, शाहूवाडी या तालुक्यांचे रेशन दुकानदार व संबंधित तहसीलदारांचा प्रशस्तिपत्र देऊन मंत्री बापट यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgirish bapatगिरीष बापट