शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  मतदान नसल्याने रखडला ११ वर्षे रस्ता, व्यावसायिकांसह प्रवाशांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:05 IST

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसर म्हणजे दिवस-रात्र प्रवाशांची ये-जा, दिवसभर नागरिकांची गर्दी असे वातावरण आहे. रिक्षाथांब्याच्या पाठीमागे असलेल्या या मार्गावर मोठमोठे खड्डे, ड्रेनेजचे झाकण वर आल्याने छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहे.

ठळक मुद्देमतदान नसल्याने रखडला ११ वर्षे रस्ता, व्यावसायिकांसह प्रवाशांना होतो त्रासनवीन डांबरीकरणाची मागणी

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसर म्हणजे दिवस-रात्र प्रवाशांची ये-जा, दिवसभर नागरिकांची गर्दी असे वातावरण आहे. रिक्षाथांब्याच्या पाठीमागे असलेल्या या मार्गावर मोठमोठे खड्डे, ड्रेनेजचे झाकण वर आल्याने छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहे.सातत्याने येथील व्यावसायिकांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे रस्त्याच्या दुर्दशाबद्दल व्यथा मांडून निवेदन दिले. या ठिकाणचे मतदान नसल्याने हा रस्ता रखडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून उमटत आहेत.मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दोनशेच्या वर व्यावसायिक आहेत.

वाहनधारकांनाही या रस्त्यावरून जाताना कसरत करीत जावे लागते.(छाया : नसीर अत्तार)महाराजा हॉटेल ते स्नानगृहापर्यंतच्या रस्त्यात अक्षरश: खड्डेच खड्डे आहेत. त्यातून वाहन चालविताना कसरत करावी लागते. त्याचबरोबर पादचाऱ्यांनाही याचा त्रास होतो. रस्ता खराब असल्याने धुळीच्या कणांचा परिणाम येथील व्यावसायिकांवर होत आहे. गेल्या ११ वर्षांहून अधिक काळ हा रस्ता खराब आहे. विशेषत: पावसाळ्यात तर रस्त्याला बकाल स्वरूप येते. यामधूनच पर्यटक, प्रवासी व नागरिकांना पायपीट करावी लागते. त्यामुळे पर्यटक, प्रवासी यांच्याकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण आल्याने रोज छोटे-मोठे अपघात नित्याचेच ठरले आहेत. त्यामुळे नवीन डांबरीकरण करावे, अशी व्यावसायिकांमधून मागणी होत आहे.(छाया : नसीर अत्तार)रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण आल्याने रोज या ठिकाणी छोटे-मोठे अपघात हे ठरलेले आहेत. महापालिकेचे कर आम्ही भरतो; पण आम्हाला सुविधा दिल्या पाहिजेत, अशी व्यावसायिकांमधून मागणी होत आहे. याप्रश्नी खासदार धनंजय महाडिक यांनाही सहा महिन्यांपूर्वी निवेदन दिले आहे. हे सर्व करूनही अद्याप रस्त्याचे नवीन डांबरीकरण झालेले नाही. ते लवकर व्हावे, अशी व्यावसायिकांमधून मागणी होत आहे.

अनेक वर्षे हा रस्ता खराब झाला आहे. सातत्याने रस्त्याप्रश्नी व्यथा मांडल्या. मात्र अद्याप या रस्त्यामधूनच आजही प्रवास करावा लागतो आहे.-रघू माने, सलून व्यावसायिक, सीबीएस, कोल्हापूर.

रस्ता आणि ड्रेनेज झाकण्यामुळे रोज अपघात होता. याचा त्रास नागरिक, पर्यटक व प्रवाशांना होतो आहे. तसेच धुळीच्या कणांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.- राजेश चौयथानी, चप्पल व्यावसायिक

हा रस्ता माझ्या शिवाजी पार्क प्रभागात येतो. या रस्त्याची टेंडर प्रक्रिया सुरू असून लवकरच वर्क आॅर्डर निघेल. जानेवारीअखेर नवीन रस्ता होईल.- आशिष ढवळे,स्थायी सभापती, कोल्हापूर महापालिका.

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर