शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महापालिकेत निधी लाटण्याचा प्रयत्न, बिंग फुटल्यावर काँग्रेस नगरसेवकांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 17:26 IST

‘वाटी तो बोटं चाखी’ या म्हणीप्रमाणे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह मोजक्या नगरसेवकांनीच ५ कोटी ०३ लाखांचा निधी वाटून घेतल्याची बाब समोर आल्यानंतर बुधवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत नाराजी तसेच निषेध व्यक्त केला. याबाबत भाजप-ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक नाराज झाले असून विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेत निधी लाटण्याचा प्रयत्नबिंग फुटल्यावर काँग्रेस नगरसेवकांत संताप

कोल्हापूर : ‘वाटी तो बोटं चाखी’ या म्हणीप्रमाणे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह मोजक्या नगरसेवकांनीच ५ कोटी ०३ लाखांचा निधी वाटून घेतल्याची बाब समोर आल्यानंतर बुधवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत नाराजी तसेच निषेध व्यक्त केला. याबाबत भाजप-ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक नाराज झाले असून विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन सत्यजित कदम यांनी हा निधी ठरावीक नगरसेवकांना दिल्याचा आरोप काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला तर एका हेडखालील बजेटमधील निधी अशाप्रकारे वाटून घेण्याचा प्रयत्न झाला असल्याने आता संपूर्ण अर्थसंकल्पातील सर्व तरतुदी पाहूनच त्याचे नियोजन केले जाईल, असे महापौर स्वाती यवलुजे यांनी सांगितले.कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात यापूर्वी असे कधी घडले नाही, असे सांगून गटनेते देशमुख म्हणाले की, आम्ही सत्तेत असून देखील प्रत्येकवेळी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना सोबत घेऊन निधी वाटपाचे सूत्र ठरविले; परंतु भाजपचे आशिष ढवळे स्थायी सभापती झाले आणि त्यांनी सर्व संकेत पायदळी तुडवून निधी वाटपात पक्षपातीपणा केला आहे. सभापतींनी अजून आम्हाला संपूर्ण अर्थसंकल्पाची प्रत दिलेली नाही. त्यामुळे आता आम्हाला ते तपासून पाहावे लागणार आहे. जर त्यांनी असाच गोंधळ अन्य हेडमध्येही केला असेल तर आम्हाला ते बदलावे लागेल.सत्यजित कदम निवडणूक लढवणार आहेत याची आम्हाला जाणीव आहे; परंतु पाच-सहा नगरसेवकांत निधी वाटून निवडणूक लढविता येत नाही. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, उपनगरांना निधी द्यायला ते विसरले आहेत. पालकमंत्री पाटील हे त्यांच्यासाठी कदमवाडी मतदारसंघ तयार करणार आहेत का? असा उपहासात्मक प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर