शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी : बर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:54 IST

भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. एस. बर्वे यांनी येथे केले.

ठळक मुद्देऔषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी शिवाजी विद्यापीठातील प्रशिक्षण शिबिर एस. एस. बर्वे

कोल्हापूर : भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. एस. बर्वे यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतिशास्त्र अधिविभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांच्यातर्फे ‘औषधी व सुगंधी वनस्पती संवर्धन व प्रक्रिया’ या विषयावरील जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या नीलांबरी सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर विभागीय कृषी सहसंचालक डी. डी. तांबाळे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. बर्वे म्हणाले, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या संधी आहेत. जगभरातील औषधे, सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या उद्योगांना त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. नैसर्गिक साधनसंपत्तीने भारत अतिशय समृद्ध आहे; तथापि, जागतिक स्तरावर या क्षेत्रातील भारताचा वाटा हा अवघा एक टक्का इतका अत्यल्प आहे. तो आणखी किमान दोन टक्क्यांनी तर आपण सहजरीत्या वाढवू शकतो.केवळ पश्चिम घाटावर लक्ष केंद्रित केले तरी बराच पल्ला गाठता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची मोठी संधी आहे. केवळ जिरॅनियमच्या लागवडीमधूनही एकरी एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, इतकी त्याची मागणी आहे. या कार्यक्रमास वनस्पतिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, अकल्पिता अरविंदेकर, मानसिंगराज निंबाळकर, आदी उपस्थित होते.

विविध उपक्रम हातीप्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या संशोधनाचा लाभ व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. प्रयोगशाळेकडून शेतीकडे या धोरणाच्या अंगिकारातून विद्यापीठाने शेतकरी वर्गाला जोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर