शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :शालेय पोषण आहारची पोती उघड्यावर, मार्केट यार्ड परिसरातील गोदामातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:37 IST

विद्यार्थ्यांसाठी दिला जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची तब्बल १४०० टन तांदळाची पोती मार्केट यार्ड परिसरातील बाबा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाबाहेर ठेवल्याचा प्रकार मंगळवारी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. या ठिकाणी छापा आंदोलन करुन उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या येथील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांला कार्यकर्त्यांनी चोप दिला.

ठळक मुद्देशालेय पोषण आहारची पोती उघड्यावर: मार्केट यार्ड परिसरातील गोदामातील प्रकार स्वाभिमान संघटनेकडून पर्दाफाश : ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला चोप दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : विद्यार्थ्यांसाठी दिला जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची तब्बल १४०० टन तांदळाची पोती मार्केट यार्ड परिसरातील बाबा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाबाहेर ठेवल्याचा प्रकार मंगळवारी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. या ठिकाणी छापा आंदोलन करुन उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या येथील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांला कार्यकर्त्यांनी चोप दिला.दुपारी साडे बाराच्या सुमारास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी गोदामाच्या ठिकाणी छापा आंदोलन केले. या ठिकाणी तांदळाची पोती उघड्यावर असल्याचे दिसून आले.

याबाबत कार्यकर्त्यांनी येथील व्यवस्थापनासाठी असलेल्या कर्मचारी रजनीकांत बुलबुले यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा सचिन तोडकर व कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला.बाबा ट्रेडिंग कंपनी ही लातूरची असून त्यांच्याकडे जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराचा ठेका आहे. कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा तांदूळ घेऊन तो जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांना पुरविला जातो.

अशा प्रकारे उघड्यावर तांदूळ ठेवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी. तसेच या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे असे सचिन तोडकर यांनी पत्रकारांना सांगितले.

बुलबले यांनी आम्ही जर वेअर हाऊस मधून या महिन्याचे धान्य उचलले नसते तर ते लॅप्स झाले असते. त्यामुळे हे धान्य गोदामात उतरविले आहे. पूर्वीचे धान्य शिल्लक असल्याने हे काही धान्याची पोती बाहेर ठेवली आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून परवानगी घेतल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर