शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : नवीन थांब्यांसह परमिट खुले करा, महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:21 IST

रिक्षा, शेअर-ए-रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी यांचे थांबे नव्याने निर्माण करावेत यासह परमिट खुले करावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनवीन थांब्यांसह परमिट खुले करा, महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणीप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : रिक्षा, शेअर-ए-रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी यांचे थांबे नव्याने निर्माण करावेत यासह परमिट खुले करावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले.यात गेल्या चार वर्षांपासून रिक्षा, शेअर-ए-रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी यांचे थांबे कमी केले आहेत. वाढलेली लोकसंख्या व वाहने लक्षात घेता नवीन थांब्यांसंदर्भात बैठक घ्यावी. यासह जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी परमिट खुले करावे. गॅसकिट नूतनीकरण प्रमाणपत्र बंगलोर येथून आणले जात होते. त्यातही हे कार्यालय अडवणूक करीत आहे.

ही सोय कोल्हापुरातही व्हावी. रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी. पासिंग ट्रॅकवर अधिकाऱ्यांकडून वाहनधारकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्याकडेही लक्ष देऊन अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.रिक्षांचा विमाही रिक्षाचालकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे राज्य शासनानेच विमा महामंडळ स्थापन करावे. त्यातून कमी दराची वाहन विमा योजना राबवावी. काही टेम्पो ट्रॅव्हलर, मॅक्सीकॅब परमिटधारकांना बोगस कागदपत्रांद्वारे परमिट मिळविले आहे, असे सांगून त्यांना टी. पी. देणे अधिकाऱ्यांनी बंद केले आहे, आदी मागण्यांचा समावेश होता.यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी येत्या दोन दिवसांत परिवहन प्राधिकरणाची बैठक बोलावली जाईल. त्यात रिक्षाथांब्याबाबत निर्णय घेऊ. यासह मोरेवाडी येथील पासिंग ट्रॅकवर लवकरच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पासिंगची सोय केली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले, राजू जाधव, दिनेश परमार, दिलीप सूर्यवंशी, योगेश रेळेकर, सचिन निकम, योगेश शिंदे, श्रीकांत सोनवले, अवधूत खोत, उत्तम भुरावणे, किशोर कांबळे, भूषण गराडे, सोमनाथ ओतारी, तानाजी भोसले, नागेश बुचडे, राजू सांगावकर, राजू भोसले, दत्ता राऊत, काका मोहिते, अजित चौगले, उत्तर रड्डे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर