शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

कोल्हापूर : पर्यावरणीय मूल्य मिळाले, तरच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल :  रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:55 PM

शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्देपर्यावरणीय मूल्य मिळाले, तरच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल :  रघुनाथ पाटीलशिवाजी विद्यापीठातील राज्यस्तरीय कार्यशाळा

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ‘कार्बन क्रेडिट्स आणि जल व्यवस्थापन’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या भाषाभवन सभागृहामधील या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे प्रमुख उपस्थित होते.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील म्हणाले, शेतकरी हा खरा संशोधक आहे. शेतीच्या माध्यमातून अन्नधान्यांच्या विविध वाणांचा प्रयोगांती शोध लावून पिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. शेतकरी पिकांच्या माध्यमातून शेतीला पाणी देतो, म्हणजेच तो पृथ्वीचे तापमान कमी करण्यास सहकार्य करीत असतो. देशातील विविध भागांमध्ये उपलब्ध परिस्थितीत शेतीच्या माध्यमातून देश जगविण्याचे महत्त्वाचे कार्य तो करतो.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विविध उद्योगधंदे व इतर माध्यमांतून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक झाल्याने ते साठवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त पद्धतीने शेतीमध्ये हे करता येणे शक्य आहे. यामुळे वातावरणातील कार्बनचा भार कमी होणार आहे. शेतकरी कशाप्रकारे कार्बन साठवणूक करतो, त्याचे मूल्यमापन कसे करणार, यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

शेतीच्या बळावर देशाला मोठ्या प्रमाणावर कार्बन क्रेडिटस् मिळविणे शक्य आहे. या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, बालेखान मुजावर, गिरीश राऊत, प्रणाली राऊत, ए. डी. जाधव यांच्यासह सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बीड, आदी विविध भागांतील शेतकरी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

संस्कारांचा वारसापिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. जनजागृतीतून शेतीच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, ही आता गरज बनली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्रामीण भाग हे संस्कारांचा वारसा जपणारे मोठे केंद्र आहे; त्यामुळे शेतकºयांचे आई-वडील वृद्धाश्रमात दिसत नाहीत, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर