शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कोल्हापूर : आता ‘मापात पाप’ नाय, ५१३ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 11:52 IST

सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र कार्यालयाने गेल्या वर्षभरात मापात पाप व उद्घोषणा केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा जादा किंमत आकारणी केलेल्या ५१३ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत १३ लाख ३४ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे; तर वजनकाटा पडताळणी मुद्रांक शुल्कातून १ कोटी ५८ लाख ३६ हजार ९७७ रुपयांचा महसूलही गोळा केला आहे.

ठळक मुद्देआता ‘मापात पाप’ नाय, ५१३ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा व्यापाऱ्यांवर वैधमापनशास्त्र कार्यालयाची करडी नजर

सचिन भोसलेकोल्हापूर : सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र कार्यालयाने गेल्या वर्षभरात मापात पाप व उद्घोषणा केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा जादा किंमत आकारणी केलेल्या ५१३ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत १३ लाख ३४ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे; तर वजनकाटा पडताळणी मुद्रांक शुल्कातून १ कोटी ५८ लाख ३६ हजार ९७७ रुपयांचा महसूलही गोळा केला आहे. त्यामुळे यापुढे ‘मापात पाप’ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर या कार्यालयाची करडी नजर राहणार आहे.गेल्या वर्षभरात या कार्यालयाने आपल्या निरीक्षकांद्वारे वजनमापे पडताळणी मुद्रांक न केलेल्या व्यापाऱ्यांकडून ४२५, तर आवश्यक वस्तूंची उद्घोषणा नसलेल्या व जादा दराने, उत्पादनाची तारीख नसलेल्या अशा ८८ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यातून १३ लाख ३४ हजार २०० रुपये इतका दंड आकारला आहे.

यासह वर्षभरात २९ हजार ३३७ व्यापारी, उद्योग, फेरीवाले, सहकारी संस्था, आदींकडून वजनमापे पडताळणी मुद्रांक शुल्क म्हणून १ कोटी ५८ लाख ३६ हजार ९७७ रुपयांचा महसूल जमा केला आहे. या कार्यालयांतर्गत पेट्रोल पंप, सोनार, किराणा, धान्य, हार्डवेअर, दूध विक्रेते, केमिकल विक्रेते, सहकारी संस्था, मॉल, उद्योग, आदींचा समावेश आहे. काटा दांडी, इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजने यांचा समावेश आहे.

उल्लंघन आढळल्यास कार्यालय वस्तू, वजनमापे जप्त करू शकतात. नव्याने काटा खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना एक वर्षानंतर पडताळणी मुद्रांक करून घेणे अनिवार्य असते. यासह ज्या ग्राहकांना अशाबाबत तक्रार करावयाची असेल तर ०२३१२५४२५४९ या क्रमांकावर ती नोंद करता येते. त्यामुळे ग्राहकांनी नि:संकोचपणे संपर्क साधावा.पडताळणी मुद्रांक (रिकॅलिब्रेशन) केलेली संख्या अशी

  1. व्यापारी - २१,३६३
  2. उद्योग- ९९०
  3. फेरीवाले - २६४२
  4. सहकारी संस्था - ४३४२ 

एकूण - २९,३३७जादा दराने अवेष्टित वस्तू, वजनमापात तूट येत असेल तर या आस्थापनांवर देखरेख करण्यासाठी व त्यांचे प्रबोधन करण्यासाठी सात सदस्यीय दक्षता समितीची स्थापना केली आहे. यात अशोक देसाई, हर्षद कुंभोजकर, हितेंद्र पटेल, अशोक कोळवणकर, श्रीकांत कुंटे, संजय हुक्केरी, रेखा हंजे यांचा समावेश आहे. महिन्यातील तिसºया सोमवारी या समितीची बैठक होते.

व्यापाऱ्यांनी आपले वजनकाटे, मग ते डिजिटल अथवा मेकॅनिकल असू देत; त्यांची वर्षातून एकदा पडताळणी करून मुद्रांक घेणे अनिवार्य आहे. जे करणार नाहीत अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यातून कमीत कमी दोन हजार व जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचा दंडही होऊ शकतो.- नरेंद्रसिंह मोहनसिंह, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र, कोल्हापूर

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर