शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रुग्णालयांना नोटिसा ; ‘स्थायी’त खडाजंगी, रुग्णालयांवरील दमदाटी खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 11:24 IST

जन्मदरातील तफावतीला जबाबदार धरून रुग्णालयांना नोटिसा पाठविल्यामुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी वादाला तोंड फुटले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची चांगलीच खडाजंगी झाली. चोर सोडून सरसकट रुग्णालयांवर केली जाणारी दमदाटी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत कदम यांनी दम दिला, तर ज्यांना नोटीस मान्य नाही, त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.

ठळक मुद्दे रुग्णालयांना नोटिसा ; ‘स्थायी’त खडाजंगीरुग्णालयांवरील दमदाटी खपवून घेणार नाही

कोल्हापूर : जन्मदरातील तफावतीला जबाबदार धरून रुग्णालयांना नोटिसा पाठविल्यामुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी वादाला तोंड फुटले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची चांगलीच खडाजंगी झाली.

चोर सोडून सरसकट रुग्णालयांवर केली जाणारी दमदाटी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत कदम यांनी दम दिला, तर ज्यांना नोटीस मान्य नाही, त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.स्थायी समिती सभेचे कामकाज सुरू होताच सत्यजित कदम यांनी रुग्णालयांना पाठविण्यात आलेल्या नोटिसीचा विषय उपस्थित केला. मुलींचा जन्मदर कमी झाला, याला रुग्णालये कशी जबाबदार आहेत? तुम्ही नोटीस कोणत्या आधारावर काढली? असे सवाल उपस्थित करून, कदम यांनी डॉ. पाटील यांना धारेवर धरले.

तुम्हाला शासनाचा अध्यादेश आला आहे का? त्याकरिता आयुक्तांची परवानगी घेतली आहे का? असे प्रश्नही कदम यांनी विचारले. त्यावेळी मला कोणाची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. मला असलेल्या अधिकारात अशा नोटिसा देऊ शकतो, असा खुलासा पाटील यांनी केला.जर तुम्ही अशा काही खटपटीमागे लावल्या, तर रुग्णांना डॉक्टर अ‍ॅडमिट करून घेणार नाहीत, अशी भीती कदम यांनी व्यक्त केली. अशा नोटीस काढण्यापूर्वी सोनोग्राफी मशिन चेक करा, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यावेळी तुम्हाला आमचे काम मान्य नसेल, तर नोटीस मागे घेतो, असे सांगताच दोघांतील वाद आणखीच वाढला. शेवटी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी मध्यस्थी करून नोटीस मागे घेण्याचा विचार करू, असे सांगितले.जरगनगर प्रभागात पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. वारंवार सांगून सुधारणा नाही. शाहू बँक चौकात मोठे लिकेज आहे. सण उत्सव काळात पाणी येत नाही. कावळा नाका ते बापट कॅम्प परिसरात कर्मचारी रजेवर गेल्याने पाणी नव्हते.

ताराबाई पार्क येथील व्हॉल दुरुस्तीचे काम गेले दीड वर्ष सुरू आहे. कदमवाडीत पाणी कमी प्रमाणात येते, अशा तक्रारी करतानाच दसरा दिवाळी सण समारंभाच्या काळात पाणी पुरवठा सुरळीत ठेवा, अशी सूचना गीता गुरव, सुनंदा मोहिते, कविता माने, आदींनी केली.कावळा नाका येथील कर्मचाऱ्यास नोटीस काढली आहे. ई वॉर्डला डिस्चार्ज वाढवण्यात येईल. कदमवाडी येथे व्हॉल सात ते आठ फुट जमिनीखाली गेले आहेत. जुने नकाशे काढून तपासणी करावी लागणार आहे, असा खुलासा पाणी पुरवठा विभागाने यावेळी केला.राजारामपुरीतील माउली चौक येथे चौक सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याठिकाणी कारंजासाठी असलेले पाण्याचे कनेक्शन बंद केले आहे, ते तातडीने सुरू करावे, तसेच लाईटची व्यवस्थाही सुरू करण्यात यावी, अशी सूचना भाग्यश्री शेटके यांनी केली. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर