शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी महापालिकेस नोटीस, करवीर प्रांताधिकाऱ्यांचे आदेश : गुरुवारी सुनावणीवेळी म्हणणे मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:01 IST

कोल्हापूर शहरातील जयंती नाल्याद्वारे सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेस फौजदारी दाखल का करू नये, म्हणून बुधवारी नोटीस बजावली. याबाबत  गुरुवारी सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देपंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेची याचिका सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश बुधवारी घेणार पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने

कोल्हापूर : शहरातील जयंती नाल्याद्वारे सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेस फौजदारी दाखल का करू नये, म्हणून बुधवारी नोटीस बजावली. याबाबत  गुरुवारी सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती; पण त्यावर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याबाबत महापालिकेने कोणतीच कारवाई केली नसल्याने सन २०१० मध्ये देसाई यांनी पुनर्याचिका दाखल केली.

याचदरम्यान इचलकरंजीतूनही कोल्हापूर महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने या दोन्हीही जनहित याचिकेच्या सुनावणी एकत्रित चालविण्यासाठी जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कमिटी नियुक्त केली; पण या कमिटीच्या दर महिन्याला बैठका होत होत्या, पण कारवाई होत नसल्याचे पुरावे उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आले.

त्यानुसार उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी करवीरचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांना पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे कायदेशीर नमुने घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी इचलकरंजी येथे पंचगंगा नदीतील रसायनयुक्त व सांडपाणीयुक्त प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

त्यानुसार पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिकेला अपयश आल्याने त्यांना जबाबदार धरून नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने चौकशी करून कारवाई करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.त्यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फौजदारी दाखल का करू नये, अशी नोटीस करवीर उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सचिन इथापे यांनी महापालिका आयुक्त, जलअभियंता, मुख्याधिकारी, पर्यावरण अधिकाऱ्यांना बजावली आहे. महापालिकेने  गुरुवारी दुपारी १ वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली कागदपत्रांच्या पुराव्यांसह बाजू मांडावी, असे नोटिसीत म्हटले आहे.कोल्हापुरात बुधवारी घेणार नमुनेजयंती नाल्यातून मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने बुधवारी पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने करवीर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे घेणार असल्याची माहिती ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका