शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लोहखनिज घोटाळाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : नंदकुमार पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:58 IST

गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अ‍ॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला दिल्लीत शास्त्रज्ञांसह उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देलोहखनिज घोटाळाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : नंदकुमार पवार गोवा, सिंधुदुर्गातील खनिजाची कवडीमोलाने विक्री २५ जानेवारीला दिल्लीत उपोषण करणार

कोल्हापूर : गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अ‍ॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला दिल्लीत शास्त्रज्ञांसह उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.पवार म्हणाले, वर्षानुवर्षे येथून कोट्यवधी टन सोने, प्लॅटिनमसारखे मौल्यवान धातू असणारे लोहखनिज कवडीमोल किमतीने चीन, जपान, कोरिया, पाकिस्तान, आदी देशांना निर्यात होत आहे. १९७६ मध्ये सिंधुदुर्गमधील लोहखनिजातील लोहाचे प्रमाण पाहताना तत्कालीन भूगर्भ संचालक आर. एस. हजारे यांना सोने, प्लॅटिनमचे अंश आढळून आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांसह शासनाकडे पाठपुरावा केला. देशातील विविध लॅबोरेटरीजचे नमुने घेतले. त्यांच्या तगाद्यामुळे वरिष्ठांनी लोहखनिजाची तपासणी करण्याचे नाटक केले.

१५ व १६ जानेवारी १९९४ ला ‘जुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’चे संचालक भोसकर, ज्युआॅलॉजिकल अ‍ॅँड मायनिंगचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कुंभार, डॉ. एम. के. प्रभू ज्युआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सक्सेना यांनी हजारे यांच्यासोबत गोवा व सिंधुदुर्गमधील लोहखनिजाचे १० सॅँपल्सचे प्रत्येकी तीन नमुने गोळा केले. त्यानंतर ते विविध लॅबोरटीजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांच्या अहवालामध्ये या खनिजात प्लॅटिनम व सोने यांचे प्रमाण आढळले. याबाबत शासनपातळीवर पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले.ते पुढे म्हणाले, यासंदर्भात २०१५ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावेळी संबंधित विभागांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सर्व्हे केल्याचे सांगितल्याने ही याचिका फेटाळली; परंतु यानंतर आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यावर सर्व्हेच केला नसल्याचे या विभागांनी म्हटले आहे.

यावर नेमलेल्या शहा कमिशनने ५०० हेक्टर जागेवर ३५ हजार कोटींचा लोहखनिज भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. त्यावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी १० एकरातच घोेटाळा झाल्याचे सांगितले आहे.यावेळी आर. एस. हजारे, उदय कुलकर्णी उपस्थित होते. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर