शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू’वरुन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:10 IST

कोल्हापूर शहरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यू रोगाची साथ अटोक्यात आणण्यात अगर उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्दे‘डेंग्यू’वरुन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळसभेत प्रशासन धारेवर; हलगर्जीपणाबद्दल मुख्य आरोग्य निरीक्षक निलंबीतचे आदेश

कोल्हापूर : शहरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यू रोगाची साथ अटोक्यात आणण्यात अगर उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडे मुख्य आरोग्यनिरीक्षकचा पदभार कसा? असा प्रश्न विचारत सभागृहात सदस्यांनी गदारोळ माजवला. अखेर डेंग्यू, कचरा उठाव आदी विषयांवरुन वादळी चर्चा होत जबाबदार असणारे मुख्य आरोग्यनिरीक्षक विजय पाटील यांना निलंबीत करण्याचे आदेश सभाध्यक्ष महापौर शोभा बोंद्रे यांनी दिले.कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात दिवसे-दिवस वाढणाऱ्या डेंग्यू विषयावरुन सदस्यांनी प्रशासनास सुरुवातीपासून लक्ष बनविले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यू’चे रुग्ण शहरभर पसरल्याचा आरोप ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी करत, डेंग्यू मध्ये बळी गेलेल्या कदमवाडीतील संजय लोहारच्या कुटूंबियांना महापालिकेतर्फे मदत जाहिर करावी अशी मागणी केली.

यावर सभागृह नेता दिलीप पवार यांनी, शहराच्या प्रत्येक गल्ली-बोळात ८-१० डेंग्यूचे रुग्ण असल्याचे सांगत खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याचे सांगितले. डेंग्यूबाबत शहरात ठोस उपाययोजना न केल्याने प्रशासनास डेंग्यूं झाल्याचा आरोप भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी करुन प्रशासनाने फक्त डेंग्यू झालेल्या काही भागात भेटी देऊन रुग्णांच्या चुका काढण्याचे काम केल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुख्य आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी शहरात मोजकेच डेंग्यूचे रुग्ण असून उपाययोजना करत असल्याचा खुलासा केला. त्यावर संतोष गायकवाड, विलास वास्कर, भूपाल शेटे, शारंगधर देशमुख यांनी डॉ. दिलीप पाटील यांच्यावर खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत शहरातील खासगी रुग्णालये डेंग्यूच्या रुग्णांनी फुल्ल असताना हा प्रशासनाकडून होणारा अकडेवारीचा फसवा खेळ थांबवा अशी विनंती केली.त्यानंतर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी गुरुवारपासून आठवडाभर विशेष मोहीम सुरु ठेवून ‘डेंग्यू’चे समुळ उच्चाटन करणार असल्याचे सांगून उपाययोजना सांगितल्या. त्यावर सदस्यांनी अक्षेप घेत पाटील यांपूर्वी का केल्या नाहीत असा कडक शब्दात जाब विचारला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर