शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणूकीकरीता दोघांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:43 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथील पोटनिवडणूकीकरीता गुरुवारी दोघांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.राज बाबुभाई जाधव (शिवसेना) व रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर (ताराराणी आघाडी) अशी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे आहेत. कॉँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार राजेश भरत लाटकर शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.माजी नगरसेवक निलेश देसाई यांचा कुणबी ...

ठळक मुद्देताराबाई पार्क प्रभाग पोटनिवडणूकीकरीता प्रक्रीया सुरुअर्ज भरण्याची उद्या अंतिम दिवस

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथील पोटनिवडणूकीकरीता गुरुवारी दोघांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.

राज बाबुभाई जाधव (शिवसेना) व रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर (ताराराणी आघाडी) अशी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे आहेत. कॉँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार राजेश भरत लाटकर शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

माजी नगरसेवक निलेश देसाई यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे पोटनिवडणुकीची प्रक्रीया सुरु झाली आहे.

प्रभाग क्रमांक ७७, शासकीय मध्यवर्ती कारागृह येथून निवडणूक आलेल्या अश्विनी अमर रामाणे यांचाही कुणबी जातीचा दाखल अवैध ठरल्याने या प्रभागातही निवडणूक प्रक्रीया सुरु झाली होती, परंतू उच्च न्यायालयाने रामाणे यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिल्यामुळे तेथील प्रक्रीया स्थगित करण्यात आली आहे.

ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणूकीची प्रक्रीया १६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस शनिवार (दि.२३) हा आहे. घटस्थापनेचा मुहुर्त साधून गुरुवारी शिवसेनेतर्फे राज बाबुभाई जाधव (भोरी) यांनी तर ताराराणी आघाडीतर्फे रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर यांनी उमेदवारी अर्ज भरले.

राज जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरताना आमदार राजेश क्षीरसागर, परिवहन सभापती नियाज खान, शिव माथाडी कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश सरनाईक, उपशहर प्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, राजू काझी, दिपक चव्हाण , महिला आघाडीच्या मंगल साळोखे, मंगल कुलकर्णी, युवासेनेचे शहर प्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण अविनाश कामते, अनिकेत राऊत, जयदिप रसाळ व शिवसैनिक उपस्थित होते. तत्पूर्वी जाधव यांनी प्रभागातून सासने गल्ली, बेकर गल्ली येथून पदयात्रा काढली.

भाजप - ताराराणी आघाडीतर्फे रत्नेश जिन्नाप शिरोळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेवक राजसिंह शेळके, माजी नगरसेवक निलेश देसाई यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते.