शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिका ‘स्वच्छ भारत अभियान’चे पुढील आठवड्यात सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:45 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण करण्याकरीता ८ ते १० फे बु्रवारी या काळात सरकारनियुक्त त्रयस्थ समितीचे पथक कोल्हापुरात येणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.राष्टÑीय पातळीवर केंद्र सरकारने महानगरपालिका हद्दीतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्या अनुषंगाने ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण करण्याकरीता ८ ते १० फे बु्रवारी या काळात सरकारनियुक्त त्रयस्थ समितीचे पथक कोल्हापुरात येणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

राष्टÑीय पातळीवर केंद्र सरकारने महानगरपालिका हद्दीतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका आरोग्य विभागाने शहरात जनजागृती केली असून ठिकठिकाणी स्वच्छतेचे फलक लावले आहेत. सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली असून काहींची रंगरंगोटी केली आहे. महापालिकेने ‘स्वच्छ भारत अ‍ॅप’ सुरू केले असून त्यावर येणाºया नागरिकांच्या तक्रारी चोवीस तासांत निरसन केल्या जात आहेत.

शहराच्या सर्व प्रभागांत घंटागाडी नियमितपणे सुरू करण्यात आलेल्या असून दैनंदिन कचरा उठावाचे विशेष नियोजन केले आहे. सार्वनिक शौचालयात पाण्याची सुविधा देण्यात आली आहे. कचरा वाहून नेणाºया गाड्या सक्षम करण्यात आलेल्या आहेत.

कें द्र सरकारने एका त्रयस्थ कंपनीला स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्याचे काम सोपविले आहे. या कंपनीचे एक पथक दि. ८ ते १० फेबु्रवारी या काळात कोल्हापुरात येऊन स्वच्छतेच्या बाबतीत ५४ मुद्द्यांवर तपासणी करणार आहे.या स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिका आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली असली तरी ओल्या व सुक्या कचराची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा मात्र महापालिकेने अद्याप विकसित केलेली नाही. कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. सध्या या प्रकल्पाची मशिनरी जोडण्याचे काम सुरू आहे.