शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

कोल्हापूर  महापालिका : पावसाचे पाणी साचलेल्या भागांची आयुक्तांकडूृृन पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:40 IST

  कोल्हापूर : गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने स्वच्छता मोहीम हाती घेऊनही अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सखल ...

ठळक मुद्देकोल्हापूर  महापालिका : पावसाचे पाणी साचलेल्या भागांची आयुक्तांकडूृृन पाहणीपाणी निर्गत करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

 

कोल्हापूर : गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने स्वच्छता मोहीम हाती घेऊनही अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सखल भागांत पाणी साचून राहिले. या भागांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली. त्यानंतर हे पाणी निर्गत करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.गेले दोन महिने महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम सुुरू आहे. तरीही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असल्याच्या तक्रारी वाढल्याने दुपारी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी संपूर्ण शहराची फिरती करून पाण्याचा निचरा का होत नाही, याची माहिती घेतली.यल्लमा मंदिर परिसर, देवकर पाणंद परिसर, श्रीकृष्ण कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी रस्त्यांवर साचलेले पाणी निर्गत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकांच्या घरांत पाणी जाण्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही आपल्या ओपन प्लॉटमध्ये पाणी साचू न देता ते वाहते कसे राहील, याची काळजी घ्यावी; जेणेकरून त्या साठलेल्या पाण्यात डास अथवा अळ्या होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.यावेळी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, प्रभाग समितीचे सभापती राजसिंह शेळके, गटनेता सत्यजित कदम, ललिता बारामते, दीपा मगदूम, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, संबंधित आरोग्य निरीक्षक, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर