शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

कोल्हापूर मनपाला फेरनिवडणूक परवडणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:29 AM

कोल्हापूर : जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत निवडणूक आयोगास सादर न केलेल्या नगरसेवकांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, १९ प्रभागांत फेरनिवडणुका घेणे केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सर्वच बाजूंनी विचार केल्यास कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणेस परवडणारे नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महापालिकेची निवडणूक घेणे गैरसोईचे असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ...

कोल्हापूर : जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत निवडणूक आयोगास सादर न केलेल्या नगरसेवकांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, १९ प्रभागांत फेरनिवडणुका घेणे केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सर्वच बाजूंनी विचार केल्यास कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणेस परवडणारे नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महापालिकेची निवडणूक घेणे गैरसोईचे असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मनपाचे अधिकारी अंगावरील धूळ झटकून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यामुळे आता वकिलांचा अभिप्राय, राज्य सरकारचा आदेश काय येतो याकडे डोळे लावून बसले आहेत.राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्यांच्या जातीची वैधता प्रमाणपत्रे निवडणूक आयोगास सादर केलेली नव्हती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर ज्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केलेले नाही, त्यांचे नगरसेवकपद रद्द होणार हे आता स्पष्ट झाले आहे. राज्य सरकार अथवा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी लोकप्रतिनिधींना संरक्षण देणे कितपत शक्य आहे, यावर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राज्य सरकारचे अधिकार यावर बरीच चर्चा झाली. कायदेतज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू आहेत. राज्य सरकारचे सचिव स्तरावरील अधिकारी कायद्याचा अभ्यास करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या ‘कलम ९ अ’मध्ये बदल अथवा सुधारणा करता येईल का ? आणि कशाप्रकारे करता येईल या अनुषंगाने चर्चा करत आहेत.निवडणूक घेण्याची वेळ आलीच, तर आपण तयार असले पाहिजे, म्हणून महापालिकेचे अधिकारी धूळ झटकून कामाला लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील महापालिकेचे वकील अभिजित आडगुळे यांच्याशी संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि त्यावरील अभिप्राय देण्याविषयी विनंती केली आहे; परंतु अद्याप निकालाची प्रत हाती पडलेली नाही. अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या निवडणूक कार्यालय तसेच नगरसचिव कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. निवडणूक घ्यावीच लागली, तर पूर्वतयारी कशी करावी यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.जर शहरातील १९ प्रभागांत निवडणूक लागलीच, तर ती परवडणारी नाही, असाच बहुतेकांचा दावा आहे. प्रशासनाच्या पातळीवर विचार केला, तर तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेची निवडणूक घेण्यास नेहमी महसूलच्या कर्मचाºयांचे सहकार्य घेतले जाते. सध्या हेच कर्मचारी मतदार याद्यांच्या तयारीत असताना महापालिका निवडणूक घ्यायची म्हटले तर खूपच गडबड होणार आहे.निवडणूक लढविणाºया इच्छुकांचीही ती एक डोकेदुखी होणार आहे; कारण गणेशोत्सव व नवरात्रौत्सव पुढच्या एक-दीड महिन्यात येत आहेत; त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी मोठी वर्गणी द्यावी लागणार आहे.म्हणूनच प्रशासनास जशा अडचणी आहेत, तशाच त्या इच्छुकांनाही आहेत. इच्छुकांनी जरी मोठा खर्च केला, तरी त्यांना काम करण्यास केवळ एक ते दीड वर्षच मिळणार आहे.महापालिका निवडणूक झाली खर्चिकमहापालिकेची निवडणूक अलीकडील काही वर्षांत खूपच खर्चिक झालेली आहे. उमेदवाराच्या हातात २० ते २५ लाख रुपयांचा निधी असल्याखेरीज राजकीय पक्षदेखील पक्षाचे तिकीट देत नाहीत. विद्यमान सभागृहात काही नगरसेवक तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करून निवडून आले आहेत. महापालिकेची निवडणूक लागलीच आणि प्रत्येक प्रभागात पहिल्या तीन उमेदवारांनी १० ते ३० लाखांच्या दरम्यान खर्च केला, तर एकेक प्रभागातच ५० ते ६० लाखांचा चुराडा होणार आहे; त्यामुळे विद्यमान नगरसेवक तसेच अन्य इच्छुकदेखील निवडणुकीला सामोरे जाण्यास नाखूश आहेत.सन २०१५मध्ये झालेला निवडणूक खर्चइतर खर्च- १ कोटी ९३ लाख ८८ हजार ५५९कर्मचारी भत्ते- ५ लाख ४८ हजारएकूण खर्च- १ कोटी ९८ लाख ३७ हजार ५९५संभाव्य निवडणूक खर्च२०१५ च्या निवडणुकीत प्रशासनाचा प्रत्येक प्रभागासाठी सरासरी २ लाख ४६ हजार१४२ रुपये खर्चया हिशेबाने संभाव्य निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागास २.५० ते ३लाख खर्च येईल.१९ प्रभागांसाठी एकूण खर्च५० ते ५५ लाख रुपये येईल, असा अंदाज आहे.